नवी दिल्ली : एप्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (Employees Deposit Linked Insurance) खास करुन ईपीएफओच्या सदस्यांसाठी राबविण्यात येते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विम्याचा लाभ मिळतो. ही विमा योजना ईपीएफ (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) यांच्या संयुक्तरुपाने मिळतो. जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावला, दुर्घटना घडली तर त्याच्या कुटुंबियांना विम्याच्या रक्कमेवर दावा करता येतो. विम्याची एकरक्कमी रोख वारसदाराला देण्यात येते. पण अनेक कर्मचाऱ्यांना या विम्याबद्दल माहिती नसते. या रक्कमेवर दावा करण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे.
ईडीएलआय योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसाला विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम 7 लाख रुपये असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना आणि विविध अधिनियम, 1952 अंतर्गत कर्मचाऱ्याला विम्याची सुविधा देण्यात येते. कर्मचाऱ्याच्या वेतनाआधारे विम्याची रक्कम मिळते. मृत्यूपूर्वी नोकरीच्या शेवटच्या वर्षात ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय अंतर्गत दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
ही कागदपत्रे आवश्यक
हे लक्षात ठेवा
विम्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर वारसदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे नाव, आधार संख्या, जन्मतारीख ईपीएफओच्या नोंदीशी जुळणे अत्यंत आवश्यक आहे.
कसा करावा दावा
जर कर्मचाऱ्यांचा, सदस्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना विम्याचे संरक्षण मिळते. ते विम्यासाठी दावा दाखल करु शकतात. त्यासाठी वारसदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्कासंबंधीचे कागदपत्रे सादर करावे लागतील.
EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे
असा करा ऑनलाईन दावा