ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय

| Updated on: Jan 04, 2022 | 11:19 AM

भारतातील कोणत्याही कानाकोपर्‍यात झालेल्या सायबर गुन्ह्याची तुम्ही तक्रार देऊ शकता.  घटना कोणत्याही प्रदेशात होऊ तुम्ही बेधडक तक्रार सायबर सेलकडे करू शकता.  ऑनलाइन फसवणुकीविरोधात तुम्हाला सायबर क्राईम सेलकडे तक्रार नोंदवावी लागते. डिजिटल फसवणुकीची तक्रार सायबर क्राईमच्या पोर्टलवर नोंदवा, न्यायदंडाधिका-यांकडे ही दाद मागता येते.

ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहे.  रोज एक नवीन प्रकरण आपल्याला वाचायला मिळते.  बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते.  डिजिटल युगाच्या या फसवणुकीचे अनेक फंडे सायबर भामटे वापरत असतात.  या जाळ्यात तुम्ही अडकला की तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम काही मिनिटातच लंपास होते.  केवायसी अपडेटच्या (KYC Update) नावाखाली,  बंपर लॉटरी लागल्याची थाप मारुन,  एलआयसी एजंट असल्याचे किंवा इतर अमिष दाखवून तुमचे खाते हॅक करण्यात येते आणि खात्यातील कमाई सायबर चोरटे लंपास करतात.

अशी घटना घडल्यानंतर सामान्यतः ग्राहक अगोदर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो.  मात्र पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला द्रविडी प्राणायाम काय असतो याची खात्री पटते.  त्याला मदत तर दूरच मनस्ताप सहन करावा लागतो.  पोलीस ठाण्याच्या चकरा मारून, पैसे गेले तरी चालतील मात्र आता पुन्हा पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको अशी त्याची अवस्था होते.  अशा परिस्थितीत पोलीस तुमच्या तक्रारीची दखल घेत नसतील तर तुम्हाला या ऑनलाईन फसवणुकीविरोधात कुठे तक्रार करता येईल चला जाणून घेऊयात.

ऑनलाइन फसवणूकी विरोधात अशी मागता येईल दाद

तुमच्या खात्यातील रक्कम अचानक वळती झाल्यास अथवा तुमच्या नकळत तुमच्या खात्यातून रक्कम काढल्या जात असेल तर याचा अर्थ तुम्ही ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरला आहात.  अशा वेळी तुम्ही यापासून की विरोधात दाद मागू शकता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरबीआयच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या बँकेत त्वरित संपर्क साधा.  बँकेला तुमच्या खात्यातून वळते झालेल्या रकमेची आणि व्यवहाराची माहिती द्या. जर या प्रक्रियेत बँकेच्या लक्षात आले की ग्राहकांची कोणतीही चूक नाही तर बँकेला संबंधित रक्कम परत करावी लागते.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे प्रत्येक बँकेने ग्राहकांसाठी ऑनलाईन फिशिंग विरोधात तक्रार नोंदविण्याची सोय केलेली आहे.  त्यासाठी बँकेने ईमेल आयडी तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्या संबंधित बँकेच्या ई-मेल आयडीवर फसवणुकीची तक्रार देऊ शकता.
नजकीच्या पोलीस ठाण्यामध्ये याविषयीची तक्रार द्या आणि गुन्हा नोंदवण्याची विनंती करा

खात्यातील रक्कम वळती झाल्यास त्वरित खाते ब्लॉक करा. तत्पूर्वी खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये वळती करून घ्या.
ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.  कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.   बँक खात्याची वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका

FIR ची नोंद अशी करा

देशातील कुठल्याही भागात तुमची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर तुम्ही सायबर क्राईम सेलकडे याविषयीची तक्रार नोंदवू शकता.  देशभरातून ही तक्रार नोंदवता येते.  घटना कुठे का झाली असेना त्या संबंधीची तक्रार सायबर सेलकडे करता येते.  त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर सर्वात आगोदर सायबर क्राईम सेलकडे तक्रार नोंदवा.

तक्रारीची संपूर्ण माहिती द्या

सायबर क्राईम सेलकडे तक्रार नोंदविताना तुमचे पूर्ण नाव,  बँक खाते क्रमांक,  तुमचा पत्ता या विषयीची संपूर्ण माहिती द्या.  ज्या शहरांमध्ये सदर तक्रार नोंदवत आहात तेथील सायबर क्राईम सेलच्या प्रमुखाचे नाव द्या किंवा एखाद्या वकिलांसोबत पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवा.  तक्रार नोंदविताना यासंबंधीचे कागदपत्रे सोबत असू द्या.

जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सायबर क्राईम सेल नसेल तर जवळच्या पोलिस ठाण्यांमध्ये ऑनलाइन फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता.  संबंधित पोलिस ठाणे तुमची तक्रार नोंदवून घेत नसेल तर तुम्ही  न्यायदंडाधिकारी (Judicial Magistrate) यांच्याकडे दाद मागू शकता. यासाठी एखाद्या वकिलाची मदत घेऊन तुम्ही तक्रार अर्ज देऊ शकता.  याव्यतिरिक्त राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल येथे तक्रार नोंदवू शकता. https://cybervolunteer.mha.gov.in/webform/Volunteer_AuthoLogin.aspx या संकेतस्थळावर ही तक्रार नोंदविता येईल.

संबंधित बातम्या :

चुकीच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्यास काय कराल?, जाणून घ्या अशा वेळी काय काळजी घ्यावी

डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची वाढ; एप्रिलपर्यंत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार!