मुंबई : करदात्यांसाठी चांगली बातमी आहे. आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. भारतीय डाक विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी ही नवीन सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरची (CSC) मदत घ्यावी लागेल. इंडिया पोस्टने या सेवेबद्दल यापूर्वीच घोषणा केली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात टपाल कार्यालयात ही सेवा सुरू झाल्यावर देशातील लाखो करदाता इनकम टॅक्स रिटर्न ITR दाखल करु शकतील.
आतापर्यंत हे काम व्यावसायिक आयकर तज्ञ किंवा सीएमार्फत करावे लागते. तर काही लोक स्वत: ऑनलाईन ITR देखील दाखल करतात. पण त्यात कर संबंधित तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अनेकांना आयटीआय दाखल करणे हे इतर कामांपेक्षा कठीण वाटते. त्यामुळे करदात्यांना दिलासा देण्यासाठी इंडिया पोस्टने ही नवीन सेवा सुरू केली आहे.
टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला आयकर विवरणपत्र भरण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. आता इन्कम टॅक्स भरण्यासाठीची सेवा तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातील CSC काऊंटरवर सहज मिळू शकते.
Now no need to travel far to file your income tax returns. You can easily access income tax return services at your nearest post office CSC counter. #AapkaDostIndiaPost
— India Post (@IndiaPostOffice) July 14, 2021
CSC म्हणजे काय?
पोस्ट ऑफिसमध्ये चालणारे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) खूप उपयुक्त मानले जाते. या केंद्रावर बरीच मोठी कामे सहज केली जातात. या केंद्राची मदत घेण्यासाठी लोकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल. पोस्ट ऑफिसची सीएससी सेवा देशभरात एकसारखी चालविली जाते. या केंद्राच्या माध्यमातून बरीच आर्थिक कामे सहजपणे निकाली काढता येतील. या ठिकाणी केलेली कामे मुख्यत: टपाल सेवा, बँकिंग आणि विमा सेवेशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक सरकारी सुविधांचे फायदे आणि माहिती सीएससी काउंटरमधून घेता येऊ शकते. देशातील नागरिकांच्या सोयीसाठी भारत सरकार डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत बरीच ई-सेवा चालवते. या सेवा टपाल कार्यालयातून घेता येतील.
(Now file Income Tax Return (ITR) at your nearest post office)
संबंधित बातम्या :
SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
विजय माल्ल्याचे शेअर्स विकून बँकांना 792 कोटी मिळाले, 58 टक्के नुकसानाची झाली भरपाई
देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार