नवी दिल्ली : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पैसा वाचवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. FD योजना खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) ऑफर करतात. समाजातील प्रत्येक वर्गात एफडीची मागणी आहे, परंतु बहुतांश मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक याला अधिक प्राधान्य देतात. फिक्स्ड डिपॉझिट ही एक योजना आहे ज्यामध्ये भांडवल सुरक्षित ठिकाणी ठेवताना दरवर्षी निश्चित व्याज दर मिळतो. FD ठेव खात्यांसाठी व्याजदर देखील सामान्य प्रकरणांमध्ये बचत खात्यापेक्षा जास्त असतो.
मुदत ठेवी दीर्घ कालावधीसाठी चालवल्या जातात, कारण खाते ठराविक वर्षांसाठी ठेवल्यासच ते फायदेशीर ठरते. साधारणपणे हे खाते सात ते दहा वर्षे चालावे लागते. एफडीच्या गुंतवणुकीवर हमी परतावा मिळतो, त्यामुळे सर्व अडचणी असूनही लोक त्यात पैसे गुंतवू इच्छितात. प्रचलित व्याजदरानुसार, जमा केलेल्या पैशावर परतावा दिला जातो.
गेल्या दोन वर्षांत एफडीचे दर कमी आहेत, विशेषत: भारताला कोविड-19 महामारीचा फटका बसल्यापासून कमी आहे. मे 2020 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोविड-19 मुळे मंदावलेली अर्थव्यवस्था लक्षात घेऊन रेपो दर कमी केले. याचाच अर्थ मुदत ठेवींवरील दरही कमी करण्यात आले आहेत. यानंतर एफडी गुंतवणूकदार गेल्या वर्षीपासून पुन्हा रेपो दर वाढीची वाट पाहत आहेत. पण ती तशीच ठेवण्याचा निर्णय आरबीआयने नुकताच घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर सामान्यतः जास्त असतात. सर्वसामान्यांच्या खात्यावरही चांगले व्याज मिळते. व्याजाची रक्कम बँकांवर अवलंबून असते, कोणती बँक किती वर्षांसाठी व्याज देते. आकडेवारीनुसार, सामान्य व्याजदर कमी असू शकतात, परंतु पाच खाजगी बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
येस बँक किमान तीन वर्षांसाठी बँकेत खाते उघडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के व्याजदर देत आहे. खाजगी बँकांमधील हे सर्वोत्तम व्याजदर आहेत. तर, जर एखाद्याने 1 लाख रुपये जमा केले, तर तीन वर्षांनी ते 1.23 लाख रुपये होईल.
RBL बँक, पूर्वी रत्नाकर बँक म्हणून ओळखली जाते, तीन वर्षांसाठी FD खाती उघडण्यासाठी 6.80 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 22,000 रुपये व्याज मिळेल.
इंडसइंड बँक तीन वर्षांसाठी एफडी खाते उघडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के व्याजदर देत आहे. गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये जमा केल्यावर 21,000 रुपये व्याज मिळेल. तथापि, या प्रकरणात किमान गुंतवणूक 10,000 रुपये असावी.
DCB बँकेत खाते उघडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी 6.45 टक्के व्याजदर मिळतो. 1 लाख रुपयांच्या रकमेवर तीन वर्षांनंतर 21,000 रुपये व्याज मिळेल.
तीन वर्षांसाठी खाते उघडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी IDFC बँकेचा FD दर 6.25 टक्के व्याजावर निश्चित करण्यात आला आहे. 1 लाख रुपयांची ठेव तीन वर्षांत 1.20 लाख रुपये होईल. (Now get 7 percent interest on 3 year fixed, know full details)
इतर बातम्या
SBI ग्राहकांसाठी खूशखबर : 2 लाखांचा विमा मोफत मिळणार, जाणून घ्या काय करावे लागेल
आता घरबसल्या करा SBI डेबिट कार्ड पिन जनरेट, या स्टेप्स करा फॉलो, क्षणात होईल काम