तुमचे बँकेत खाते नाही. परंतु तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीकडे युपीआय म्हणजेच युनिफाइड इंटरफेस पेमेंट सिस्टम आहे, तर तुमच्यासाठी नवीन फिचर सुरु झाले आहे. आता एका युपीआय अकाउंटवरुन पाच जणांना पेमेंट करता येणार आहे. युपीआय सर्कल नावाचे हे फीचर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरु केले आहे. नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) हे फीचर लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे युपीआय अकाउंट परिवारातील पाच सदस्यांसोबत शेअर करता येणार आहे.
एका युपीआय अकाउंटचा वापर परिवारातील पाच सदस्यांच्या पाच मोबाईल क्रमांकावर करता येणार आहे. या माध्यमातून एका दिवसांत 5,000 रुपये तर एका महिन्यात 15,000 रुपयांचा व्यवहार करता येणार आहे. घरात एकाच व्यक्तीचे बँक खाते असते. परंतु घरातील महिला, वृद्ध किंवा मुलांचे बँकेत खाते नसेल तर त्यांना आता युपीआयचा वापर करता येणार आहे. कोणताही युपीआई युजर आपल्या डिजिटल पेमेंट्ससाठी सेकेंडरी युजरची निवड करु शकतो.
युपीआई सर्कलमध्ये दोन प्रकारचे युजर असणार आहे. त्यात पहिला युजर प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी असणार आहे. सेंकडरी युजरला पूर्ण किंवा मर्यादीत भाग वापरण्याची सुविधा असणार आहे. प्रायमरी युजर कोणाला सेंकडरी युजर बनवू शकतो. त्याला सेंकडरी युजरला पूर्ण पेमेंट किंवा मर्यादित पेमेंट पर्याय देखील देता येईल. म्हणजे सेंकडरी युजरला पेमेंट करण्यासाठी मर्यादा लादता येणार आहे.
सेंकडरी युजरला विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक पेमेंटसाठी प्रायमरी खातेधारकाच्या परवानगीची गरज नाही. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पेमेंटसाठी मंजुरी लागणार आहे. त्याच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय पेमेंट प्रक्रिया पूर्ण होणार नाही. या व्यवहारासाठी UPI पिन आवश्यक आहे. भारतीय युपीआय आता देशात नाही, विदेशात सुरु झाले आहे. अनेक देशांनी त्याला मान्यता दिली आहे.