बाबा रामदेव यांची रुची सोया (Ruchi Soya) ही कंपनी गुंतवणूकदारांना (Investment) पैसे कमावण्याची संधी देत आहे. ही संधी सेबीच्या (SEBI) नियमात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीही गुंतवणूक करून नफा कमावू शकतो. मात्र, ही संधी काही मर्यादित दिवसांपुरतीच आहे. अशा वेळी फायदा करून घ्यायचा असेल तर अंतिम तारखेपूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 रोजी पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे. रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपयांपर्यंत आहे. सेबीचा नियम भंग होऊ नये यासाठी रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.
रुची सोयाची एफपीओ
बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांची फॉलोऑन पब्लिक ऑफर (FPO) गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एफपीओ अंतर्गत कंपनी बाजारभावापेक्षा कमी दराने शेअर्स बाजारात दाखल करणार आहे. अशावेळी या एफपीओमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवता येईल. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे.
रुची सोयाचा एफपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तुमचं डिमॅट खाते असेल तर या एफपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी पैशात शेअर्स खरेदी करु शकता.
रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपया दरम्यान मिळणार आहे. रुची सोया एफपीओमध्ये गुंतवणूक केली तरी चांगली कमाईची संधी आहे. सध्या हा शेअर 880 रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आता या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
रुची सोयाच्या एफपीओमधील लोकांनी किमान 21 शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर बोली लावल्यास तुम्हाला किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर यापेक्षा जास्त शेअर्ससाठी बोली लावायची असेल तर 21 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल.
सेबीच्या नियमानुसार कंपनीला हा एफपीओ आणायचा होता. शेअर बाजारात कंपनी सुचीबद्ध झाल्यास त्यातील प्रवर्तकांची हिस्सेदारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा सेबीचा नियम आहे. त्याचबरोबर रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.