मुंबई : गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नुकतंच जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. त्यातच पेटीएमने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडरच्या बुकींगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. (
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकींगवर मिळणाऱ्या या ऑफरबद्दलची माहिती दिली आहे. यानुसार तुम्हाला पेटीएमच्या खास पद्धतीने बुकींग करुन कॅशबॅक मिळू शकतो. तुम्हाला आता ग्राहकांना पेटीएमकडून 900 रुपये कॅशबॅक मिळू शकतो.
कोणाला होणार फायदा?
‘पेटीएम’ने नुकतंच ग्राहकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अॅपद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करेल, त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला 3 वेळा एलपीजी सिलिंडर बुकिंगवरही 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
Get up to ₹900 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/4xn4H7wD7R. Terms & Conditions Apply. #LPGBooking pic.twitter.com/gFOsDcnWym
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 20, 2021
बुकींग कसे कराल?
‘या’ दोन विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी पाहावी लागणार आणखी वाट https://t.co/twhPSd2pCs #DA #DR #armedforces
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
(
संबंधित बातम्या :
RD वर सर्वाधिक व्याज देतात ‘या’ बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम
तुमच्याकडे 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर 5 लाख कमावण्याची सुवर्णसंधी
पेन्शन फंड ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला मुभा, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?