इंटरनेट कॅपेवरुन (Internet Cafe) ई-आधार कार्ड काढताना गाफील राहू नका. आधार कार्ड (Aadhaar Card)आजच्या काळात खूप महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) सर्व आधारकार्ड वापरकर्त्यांना आधार कार्डच्या गैरवापराविषयी सतर्क केले आहे. तुमचा गाफिलपणा तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तुमच्या आधारकार्डची सुरक्षा आणि नियमन करणा-या प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये प्राधिकरणाने ई-आधारकार्ड सेवा पुरविणा-या सार्वजनिक कम्प्युटर केंद्रावरुन आधार कार्ड डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेट कॅफेवर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. तुमच्या डाटाचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचा धोका असल्याने प्राधिकरणाने अशा ठिकाणी आधारकार्ड डाऊनलोड करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पण आधारबाबत एक एक उत्तम गोष्ट म्हणजे त्याचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची माहिती तुम्ही वेळोवेळी मिळवू शकता.आधार’च्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
आपल्या सर्वांना माहित आहे की, आधार कार्डमध्ये आपले नाव, पत्ता, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि फोटो तसेच बोटांचे ठसे आणि डोळ्यांची ठेवण याच्या खुणा आहेत. अशा परिस्थितीत आपल्या आधार कार्डचा कोणी गैरवापर तर करू शकत नाही ना, अशी भीती अनेकांना वाटत असते.
जर तुम्हालाही आधार कार्डची सुरक्षा आणि गैरवापराबद्दल चिंता असेल तर तुम्ही आधार संकेतस्थळाला भेट देऊन गेल्या 6 महिन्यांत आधार कार्डच्या वापराबद्दल माहिती घेऊ शकता. UIDAIच्या संकेतस्थळावर तुम्हाला आधारचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची संपूर्ण माहिती मिळते.