नवी दिल्ली: देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी (IOC, HPCL आणि BPCL) शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वर जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनित तेलाचा दर कमी होऊनही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोलने 121 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलने 112 रुपये प्रतिलीटरचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये आज पेट्रोल 121.25 रुपये आणि डिझेल 112.15 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये प्रति लीटर आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 35 आणि 36 पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.79 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 105.80 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 108.99आणि 97.72 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओपेक या संघटनेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. 1960 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर या संघटनेचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संघटनेने आगामी बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास खनिज तेलाचे दर कमी होतील.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!