मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून ब्रेक लागलेल्या इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नुकतंच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या आहे. आज (गुरुवार, 15 जुलै 2021) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आज चार मोठ्या राज्यात पेट्रोलची किंमत ही 31-39 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 15-21 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशभरात इंधनाचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 15 July 2021)
जुलैमध्ये सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ
दरम्यान यामुळे जुलै महिन्यात सलग आठ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती या 5 वेळा वाढल्या आहेत. तर एकदा त्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
शहर | पेट्रोल (रुपये/लिटर) | डिझेल (रुपये/लिटर) |
नवी दिल्ली | 101.54 | 89.87 |
मुंबई | 107.54 | 97.45 |
कोलकाता | 101.74 | 93.02 |
चेन्नई | 102.23 | 94.39 |
नोएडा | 98.73 | 90.34 |
बंगळूरु | 104.94 | 95.26 |
हैदराबाद | 105.52 | 97.96 |
पाटणा | 103.91 | 95.51 |
जयपूर | 108.40 | 99.02 |
लखनऊ | 98.63 | 90.26 |
गुरुग्राम | 99.17 | 90.47 |
चंदीगड | 97.64 | 89.50 |
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.
(Petrol Diesel Price Fuel Rate Today 15 July 2021)
संबंधित बातम्या :
महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात
10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता; सरकारचा एक निर्णय ठरू शकतो कारणीभूत