Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरुच, नव्या उच्चांकाच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचा दर

| Updated on: Oct 16, 2021 | 8:44 AM

Petrol Diesel | पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.47आणि 94.27रुपये इतका आहे.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरुच, नव्या उच्चांकाच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचा दर
पेट्रोल-डिझेल
Follow us on

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरु झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.47आणि 94.27रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अवघ्या 13 दिवसांत पेट्रोल-डिझेलची सुस्साट दरवाढ

ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे 4.35 रुपयांनी महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.

कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?