नवी दिल्ली: केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही दिवसांनी, पंजाब सरकारने राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 10 आणि 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. पंजाबमध्ये सध्या पेट्रोल 103.97 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.
जगभरातील कच्च्या तेलाची विक्री करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या OPEC+ आणि रशियाने दर महिन्याला कच्च्या तेलाचे उत्पादन 4 लाख बॅरल प्रतिदिन वाढवण्याची घोषणा केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या सल्ल्यानंतरही ओपेक त्यांच्या निश्चित कार्यक्रमानुसार काम करत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याचे वातावरण आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $80 वरून $84 प्रति बॅरल झाली आहे.
आता क्रूडच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, भारत आणि चीनसारख्या देशांकडून यापुढे मागणी वाढण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $80-90 च्या दरम्यान राहू शकते. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे मागणी वाढू शकते.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार
कोणत्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?, तुमच्या शहरातील दर काय?
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ स्थानकावर डिलक्स टॉयलेट अन् एसी लाऊंजची सुविधा मिळणार