पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते

| Updated on: Nov 28, 2021 | 1:52 PM

काही कारणांमुळे ज्यांचे पीएफ खाते बंद झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर महिन्याला केवळ पाचशे रुपये भरून, संबंधित कर्मचाऱ्यांना आपले खाते सुरू ठेवता येणार आहे. याबाबत लवकरच ईपीएफओकडून (EPFO) नवा नियम तयार करण्यात येणार आहे.

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते
EPFO
Follow us on

नवी दिल्ली : काही कारणांमुळे ज्यांचे पीएफ खाते बंद झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर महिन्याला केवळ पाचशे रुपये भरून, संबंधित कर्मचाऱ्यांना आपले खाते सुरू ठेवता येणार आहे. याबाबत लवकरच ईपीएफओकडून (EPFO) नवा नियम तयार करण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा अशा कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, ज्यांचे पीएफ खाते नोकरी सुटल्यानंतर बंद झाले आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांना होणार फायदा 

सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ईपीएफओकडून नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. नवा नियम लागू  झाल्यानंतर ज्यांचे पीएफ खाते बंद आहे, किंवा संबंधित व्यक्ती कोणत्याही नोकरीला नाही, अशा कर्मचाऱ्यांना आपले पीएफ खाते सुरू ठेवता येणार आहे. पीएफ खाते सुरू ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीला दर महिन्याला पाचशे रुपये किंवा आपल्या एकूण मासिक उत्पन्नातला तेरावा हिस्सा पीएफ खात्यात जमा करावा लागेल.

केव्हा येणार नवा नियम ?

मिळालेल्या माहितीनुसरा सध्या जे व्यक्ती पीएफच्या योजनेतून बाहेर पडले आहेत, अशा व्यक्तींची एकूण पीएफची रक्कम त्यावर मिळणारे व्याज आणि इतर फायदे अशा गोष्टींचा अभ्यास सध्या ईपीएफओकडून सुरू आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ईपीएफओकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार  2018-20 या दोन वर्षांमध्ये तब्बल 48 लाख लोकांचे पीएफ खाते बंद झाले आहेत. कोरोना.महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले होते. त्यामुळे या संख्येत आणखी भर पडली आहे.

संबंधित बातम्या 

कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत