नवी दिल्ली: भारत मुक्त व्यापार करारांद्वारे परकीय बाजारपेठांमध्ये व्यापाराच्या परस्पर आणि समान प्रवेश शोधत आहे, ज्यासाठी भारताकडून अन्य देशांशी बोलणी सुरु आहेत, असे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. भारत सध्या संयुक्त अरब अमिराती, यूके आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) साठी वाटाघाटी करत आहे.
मुक्त व्यापार करारांतर्गत, दोन व्यापार भागीदार त्यांच्यामध्ये व्यापार केलेल्या जास्तीत जास्त मालावरील सीमाशुल्क कमी करतात किंवा काढून टाकतात. याव्यतिरिक्त, ते सेवा क्षेत्रातील व्यवसाय आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नियमांचे उदारीकरण करतात. याविषयी माहिती देताना गोयल म्हणाले की, FTA च्या माध्यमातून आम्ही परदेशातील बाजारपेठांमध्ये परस्पर आणि समान प्रवेश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. एफटीए दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे असंतुलन निर्माण झाले तर एफटीए कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
यापूर्वीचे भारताचे अनेक करार संतुलित नव्हते. त्यामुळे संबंधित देशांसोबत व्यापार करताना व्यापारी तूट वाढली. आम्ही संतुलित, निष्पक्ष आणि न्याय्य एफटीएसाठी काम करत आहोत, जेणेकरून दोन्ही पक्षांना फायदा होईल, रोजगार निर्माण होईल आणि आमच्या लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगासाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असे पियूष गोयल यांनी सांगितले.
आगामी वर्षात भारताची निर्यात 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा इरादा पियूष गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवला होता. भारतीय उत्पादनांचे आक्रमक मार्केटिंग, मुक्त व्यापार करार (FTA) ची वेळेवर अंमलबजावणी आणि MSME कंपन्यांना स्वस्त कर्ज यामुळे पुढील आर्थिक वर्षात देशाची निर्यात 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यास मदत होईल, असे गोयल यांनी म्हटले होते.
इलेक्ट्रॉनिक्स, वाहने आणि ऑटो पार्ट्स, फार्मास्युटिकल्स आणि रसायने यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर निर्यातीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले होते. मुंबईस्थित आघाडीचे निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले की, 2022-23 मध्ये $500अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा गाठणे शक्य आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत निर्यात 400 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल, असा विश्वास शरद कुमार सराफ यांनी व्यक्त केला.
इतर बातम्या:
सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 303 कोटींची गुंतवणूक
जपानमध्ये महागाईचा उच्चांक, तिसरी मोठी अर्थव्यवस्था संकटात, भारतात जपानी वस्तू महागणार?
प्रवासादरम्यान तिकीट हरवले? चिंता करू नका; ‘असे’ मिळवा डुप्लीकेट तिकीट