मुंबई : नवीन वर्षामध्ये गुंतवणुकीचा संकल्प असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची अल्पबचत मुदत योजना फायदेशीर ठरू शकते. या अल्पबचत योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सोबतच यातील गुंतवणूक ही पूर्णतः सुरक्षित असते. जर बँक दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 5 लाख रुपये मिळू शकतात. मात्र टपाल खात्यात केलेली ही गुंतवणूक तुम्हाला बुडवत नाही.
टपाल खात्यातील ही बचत योजना पूर्णतः सुरक्षित असते. याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या बचत योजनेत तुम्ही अत्यंत कमी रकमेपासून गुंतवणूक करू शकता. टपाल खात्याच्या योजनेमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचाही समावेश आहे या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिस मधील पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्या 7.1 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. दर वर्षी गुंतवणूक रकमेवर कंपाऊंडिंग पद्धतीने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेले आहे.
टपाल खात्याच्या अल्पबचत मुदत योजनेअंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये किमान 500 रुपये तर कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकदार सदर रक्कम एक रकमी भरू शकतात अथवा हप्त्याने जमा करू शकतात.
टपाल खात्याच्या अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना 15 वर्षे कालावधीची आहे. 15 आर्थिक वर्षांमध्ये पीपीएफ खाते ग्राह्य धरले जाते. यामध्ये पहिल्या वर्षाची नोंद होत नाही, योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकदारांपुढे पुढील पर्याय असतात.
टपाल खात्यातील प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये मुदतपूर्व योजना बंद करण्याची अनुमती मिळते. मात्र ही अनुमती योजना सुरू होण्याच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी आणि पाच वर्षानंतर मिळते. अचानक उद्भवलेले आर्थिक खर्च किंवा अनुषंगिक खर्च, आपत्कालीन स्थितीत खातेधारकाला मुदतपूर्व योजना बंद करता येते अथवा खातेदाराचा निवासी पत्ता बदलला असेल किंवा तो दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेला असेल तर सदर योजना मुदतपूर्व बंद करता येते. ही योजना गुंतवणुकदारांसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवून देणारी आहे. मात्र अधिक परतावा अपेक्षित असणाऱ्या गुंतवणुकदारांना यामध्ये भ्रमनिरास होऊ शकतो.
युनियन आणि सेंट्रल बँकांची ग्राहकांसाठी खास योजना, 9 टक्क्यांपेक्षा कमी व्याजने व्यक्तिगत कर्ज
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत
(Post office PPF public provident fund scheme know interest rate features)