दहा हजार रुपयांची बचत करा आणि मिळवा 16 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पोस्टाची खास योजना

| Updated on: Nov 10, 2021 | 12:45 PM

तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता याची कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे. | Post Office

दहा हजार रुपयांची बचत करा आणि मिळवा 16 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पोस्टाची खास योजना
Follow us on

नवी दिल्ली: तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस स्कीममध्येही तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना अधिक चांगल्या आहेत. यामध्ये कमी खर्चात गुंतवणूक केल्यास मोठी कमाई होते. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे – पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

काय आहे रिकरिंग डिपॉझिट स्कीम?

या योजनेद्वारे, तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता याची कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे.

किती व्याज मिळणार?

पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आरडी खाते पाच वर्षांसाठी असते. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या पैशावर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह तुमच्या खात्यात जोडले जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या आरडी स्कीमवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार त्यांच्या सर्व लहान बचत योजनांमध्ये दर तिमाहीला व्याजदर जाहीर करते.

10 हजाराची बचत करुन 16 लाख कसे मिळवाल?

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये सलग दहा वर्षे दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 16,26,476 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही आरडीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्ता भरण्यास उशीर झाल्यास, तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. यासोबतच तुम्ही सलग चार हप्ते जमा न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.

काय आहे पोस्टाचा रुल ऑफ 72?

पोस्ट ऑफिस योजना ज्यांना त्यांच्या पैशातून धोका पत्करायचा नाही त्यांच्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवते आणि सरकार त्यावर उत्तम परताव्याची हमी देते. पोस्ट ऑफिस योजनेत तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्व महत्त्वाच्या पोस्ट ऑफिस बचत योजनांबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे दुप्पट व्हायला किती वेळ लागेल. तुमचे पैसे केव्हा दुप्पट होतील याची गणना करण्यासाठी 72 चा नियम वापरला जातो.

रुल ऑफ 72 हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे, ज्याचा वापर करून तुमचे पैसे कधी दुप्पट होतील याची गणना करता येते. हे खरं तर गणितीय समीकरणांवर आधारित एक तंत्र आहे, ज्यावरून हे अगदी सहजपणे कळू शकते की किती वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. या नियमानुसार, व्याजदराला 72 ने भागून मिळणारा निकाल, व्यक्तीची गुंतवणूक त्या वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते. हा फॉर्म्युला साधारणपणे एफडी इत्यादी गुंतवणुकीसाठी वापरला जातो.

संबंधित बातम्या:

पोस्ट ऑफिस योजनेत आता किती व्याजदर?, जाणून घ्या

पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडा, दरमहा मोठी कमाई होणार