Marathi News Utility news Post office saving schemes sukanya samridhi yojana know interest rate features
सर्वाधिक व्याजासहित कर सवलतीचा ही फायदा, या योजनेत करा गुंतवणूक
टपाल खात्याच्या अल्प गुंतवणूक योजनेत जसे की सुकन्या समृद्धी योजनेचा बोलबाला आहे. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी अनेक पालकांनी या योजनेला प्राधान्य आणि पसंती दिली आहे. जाणून घेऊयात या योजनेचे फायदे
महागाई भत्त्यात वाढ होणार
Image Credit source: twitter
Follow us on
सुरक्षित परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेचा विचार करत असाल तर टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना फायदेशीर ठरेल. या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर यात गुंतवलेला (Investment)पैसाही पूर्णपणे सुरक्षित आहे. बँक दिवाळखोरीत (Bank Default)गेली तर फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसचं (Post Office) तसं नाही टपाल खात्याची सरकारने हमी घेतली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक अगदी कमी रकमेत सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी अनेक पालकांनी या योजनेला प्राधान्य आणि पसंती दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे.एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
व्याज दर
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज देण्यात येते.
दीड लाखांपर्यंत गुंतवणूक
एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यानंतर त्या व्यक्तीला 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. एकरकमी या योजनेत ठेवी ठेवता येतात. एक महिना अथवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
खाते कोण उघडू शकेल?
सुकन्या समृद्धी योजनेत पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत मुलीच्या नावे एकच खातं उघडता येतं. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडले जाऊ शकते. जुळ्या किंवा तीन मुलींच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात.
करसवलतीचे फायदे
सुकन्या समृद्धी योजनेत जमा झालेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावट मिळू शकते.
योजनेचा कालावधी
या अल्प गुंतवणूक योजनेत गुंतवणूक सुरू केल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी खातं बंद करता येतं. याशिवाय वयाच्या 18 वर्षानंतर मुलाच्या लग्नाच्या वेळीही अकाऊंट बंद करता येऊ शकतं. लग्नाच्या तारखेच्या एक महिना आधी किंवा योजनेनंतर तीन महिन्यांनी खाते बंद होऊ शकते.