Post Office Savings Scheme : दर महिन्याला गुंतवा 1,411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपयांचा परतावा

| Updated on: Jan 18, 2022 | 12:26 PM

पोस्ट खात्याच्या अनेक गुंतवणूक योजना तुम्हाला निश्चित उत्पन्नातून मालामाल करु शकता. दर महिन्याला सातत्याने केलेली गुंतवणूक काही वर्षांनी तुम्हाला लखपती करेल. या योजनेत जोखीम तर नाही, उलट  निश्चित उत्पन्नाची हमी आहे.

Post Office Savings Scheme : दर महिन्याला गुंतवा 1,411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपयांचा परतावा
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

भारतीय टपाल खाते ग्रामीण जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध गुंतवणूक योजना आणते. या योजना देशामध्ये लोकप्रिय आहेत. पोस्ट खात्याच्या अनेक गुंतवणूक योजना तुम्हाला निश्चित उत्पन्नातून मालामाल करु शकता. दर महिन्याला सातत्याने केलेली गुंतवणूक काही वर्षांनी तुम्हाला लखपती करेल. या योजनेत जोखीम तर नाही, उलट  निश्चित उत्पन्नाची हमी आहे. विशेष म्हणजे या योजनेला सरकारचे संरक्षण आहे. चांगल्या व्याजदरासह सुरक्षित उत्पन्नाची हमी म्हणून मध्यमवर्ग ही या योजनेकडे आकर्षित झाला आहे.  इंडिया पोस्टने आपल्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत ग्राम सुरक्षा योजना हाती घेतली आहे. ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी 1995 मध्ये  सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सामान्यत: ग्रामीण जनतेला विमा संरक्षण देणे आणि विशेषत: ग्रामीण भागातील दुर्बल घटक आणि महिला कामगारांना फायदा करून देणे आणि ग्रामीण लोकांमध्ये विमा जागरूकता पसरवणे हा आहे.

किशोरवयीन मुलांसाठी फायदेशीर योजना

टपाल खात्याच्या ग्राम सुरक्षा योजना किंवा ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराने या योजनेत मासिक 1,500 रुपये जमा केल्यास त्याला 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. ही योजना किशोरवयीन मुलांसाठी गुंतवणुकीचा फायदेशीर पर्याय आहे. ग्राम सुरक्षा योजनेसाठी कमीत कमी  19 वर्षे वयाची अट आहे. तर जास्तीत जास्त 55 वर्षे कमाल मर्यादा आहे. भारतीय टपाल खात्याच्या वेबसाइटवर याविषयी माहिती दिली  आहे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक त्यासाठी पात्र ठरतो.या योजनेअंतर्गत किमान 10,000 रुपये ते कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.  ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत 80 वर्षे वयाच्या अथवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर वारसदारांना बोनससह खात्रीशीर रक्कम  देय आहे.

तीन वर्षांनंतर मिळतो पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्याय

ग्राम सुरक्षा योजनेत हप्ता भरताना गुंतवणूकदाराला पर्याय मिळतो. एखाद्याला मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्ता भरता येतो. हप्ता भरताना 30 दिवसांची सवलत मिळते. त्यामुळे हप्ता वेळेत भरता न आल्यास प्रलंबित शुल्कासह गुंतवणूकदाराला हप्ता भरण्याची मुभा मिळते. जर एका गुंतवणूकदाराने ग्राम सुरक्षा योजनेत वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांच्या  गुंतवणूक केली, तर ५५ वर्षांसाठी मासिक हप्ता 1,515  रुपये, 58 वर्षांसाठी 1,463  रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60  लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40  लाख रुपये तर 60 व्या वर्षी 34.60  लाख रुपयांचा परतावा मिळेल. गुंतवणूकदाराला 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्यायही मिळतो. परंतु ग्राहकाला ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत कोणतेही फायदे मिळत नाहीत.

VIDEO : Obc Reservation | राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे – Chandrashekhar Bawankule

Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले

Flipkart Republic Day Sale 2022 : TCL च्या टॉप क्लास स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी