NSC Investment | टपाल खात्यातील (Post Office) अल्पबचत योजनेतील (Small Saving Scheme) गुंतवणुकीत तुम्हाला अवघ्या पाच वर्षांत चांगला परतावा मिळवता येतो. ही योजना गुंतवणुकदारांसाठी अगदी फायदेशीर असून चक्रव्याढ व्याजाच्या करिष्म्यातून ग्राहकाला जोरदार परतावा मिळतो. या योजनेत पाच वर्षांत तुम्ही 20 लाखांचा निधी उभारू शकता.एवढ्या अल्पकाळात मोठा निधी उभारण्यासाठी गुंतवणुकदारांना टपाल खात्याच्या अल्प बचत योजनांमध्ये पैसा गुंतवावा लागेल. पोस्ट खात्यामार्फत बचतीसाठी अनेक प्रकारच्या सरकारी गुंतवणूक योजना सुरु आहेत. या योजनांमध्ये बचतीसोबतच ग्राहकांना चक्रव्याढ व्याजाचा (Compound Interest) मोठा लाभ मिळतो. विशेष म्हणजे या बचत योजनांना सरकारचे अभय आहे. त्यामुळे अल्पबचत योजनांमधील गुंतवणूक ही संपूर्णता सुरक्षित असते.
टपाल खात्यातील योजनांमधील गुंतवणूक चांगल्या परताव्यासोबतच रक्कमेवर सुरक्षा ही देतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत अवघ्या 5 वर्षात 20 लाख रुपयांचा परतावा मिळवता येतो. रक्कम जास्त गुंतवल्यास गुंतवणुकदारांना करोडपती सुद्धा होता येते. पाच वर्षांत चक्रव्याढ व्याजाच्या बळावर हा करिष्मा करता येतो. विशेष म्हणजे या गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. अगदी 100 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. तर कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्यासोबतच सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळते.
या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. 100 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज देत आहे. कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षे या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते.
या योजनेत गुंतवणुकदाराला कर सवलतही (Tax Benefit) मिळते. ग्राहकाने केलेल्या एकूण गुंतवणुकीवर सरकारकडून प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेवर गुंतवणुक करता येते. व्याजातून ग्राहकाला होणारा फायदा करपात्र आहे. गुंतवणुकदार व्याज उत्पन्न परताव्यात जमा करू शकतो.
या योजनेतंर्गत 5 वर्षांत 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील.चक्रव्याढ व्याजाचा या रक्कमेवर फायदा मिळेल. कम्पांऊंड इंटरेस्टच्या माध्यमातून 6.8 टक्के दराने तुम्हाला 6 लाख रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे गुंतवणुकदाराला 20.58 लाख रुपये मिळतील. तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तुम्हाला फायदा मिळेल. पाच वर्षांसाठी तुम्ही योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास व्याजाद्वारे 1,38,949 रुपये मिळतील. तर 2 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजासहीत 2,77,899 रुपये हाती येतील. 5 लाख गुंतवणुकीवर 6,94,746 रुपये मिळतील.