नवी दिल्ली: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच Public Provident Fund (पीपीएफ) हा गुंतवणुकीसाठी चांगला मार्ग मानला जातो. पीपीएफ ही एक अशी योजना आहे ज्यात खात्रीशीर परतावा मिळण्याबरोबरच कर लाभ, करात सूट आणि जमा केलेल्या भांडवलाची हमी सुरक्षा मिळू शकते. पीपीएफ (पीपीएफ डिपॉझिट) मध्ये मिळणारे व्याज आणि रिटर्न म्हणून मिळालेली रक्कम करपात्र नाही.
पीपीएफवरील व्याजदराची तुलना इतर अल्प बचत योजनांशी केल्यास परिस्थिती अधिक चांगली दिसेल. व्याजदर जितका जास्त तितका ठेवीदाराला परतावा जास्त. ठेवीदाराला आणखी बरेच फायदे मिळतात, जसे की तो PPF चे पैसे एकरकमी किंवा जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये (PPF गुंतवणूक) जमा करू शकतो. ठेवीदार एका वर्षात किमान 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. सध्या व्याज दर 7.1 टक्के आहे आणि PPF खाते 15 वर्षे सुरु राहते.
PPF आपल्याला करोडपती होण्याची संधी देते. यासाठी तुम्हाला खात्यात नियमितपणे पैसे टाकावे लागतील. PPF खाते 15 वर्षांनंतर मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला ते बंद करण्याची गरज नाही. खाते बंद करण्याऐवजी, खाते पुढील 5 वर्षांसाठी वाढवता येईल.
मॅच्युरिटीवर मिळालेले पैसे काढले नाहीत तरच तुम्ही करोडपती व्हाल हे लक्षात ठेवा. तुम्ही ते पैसे पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा जमा करा. 7.1 टक्के दराने दरवर्षी 1.5 लाख रुपये (PPF गुंतवणूक) जमा करत रहा. अशा स्थितीत 20 वर्षात तुमच्या खात्यात सुमारे 66.6 लाख रुपये जमा होतील. आता तुम्हाला ते खाते पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा वाढवावे लागेल. पीपीएफ खात्याची मुदत 5 वर्षांसाठी वाढवा आणि दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा करा. 25 वर्षांनंतर तुमच्या खात्यात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तयार आहे.
कर्जही काढण्याची सुविधा
तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. आपण पीपीएफ खाते उघडले त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एका आर्थिक वर्षापासून ते पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पीपीएफकडून कर्ज घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. जर आपण जानेवारी 2017 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त 25% कर्ज घेऊ शकता.
पीपीएफ खाते कोणत्याही न्यायालय किंवा आदेशाद्वारे कर्ज किंवा इतर उत्तरदायित्वाच्या वेळी जप्त करणे शक्य नाही. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडले जाऊ शकते. नियमांनुसार पीपीएफ खाते हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (एचयूएफ) नावे उघडता येत नाही.
संबंधित बातम्या:
PPF अकाऊंटवरही मिळू शकते अत्यंत कमी व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही
PPF खात्याचे 5 मोठे फायदे, छोट्या बचतीवर बंपर रिटर्न मिळण्याची संधी
PPF | मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड जमवा