provident fund | ई-नॉमिनेशन नसेल तर पीएफच्या पासबूक ला लॉक

| Updated on: Jan 12, 2022 | 9:55 AM

ई-नॉमिनेशन नसेल तर ईपीएफओ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लकी दिसणार नाही. वारसदाराचे नाव जोडलेले असेल तर अशा सदस्यांना खात्यातील बॅलन्स चेक करता येईल. अन्यथा त्यांना या सेवेला मुकावे लागणार आहे. यापूर्वी खात्यात किती रक्कम आहे हे सहज तपासता येत होते. आता त्यासाठी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

provident fund | ई-नॉमिनेशन नसेल तर पीएफच्या पासबूक ला लॉक
EPFO Alert
Follow us on

मुंबई : ईपीएफओ (EPFO) खात्याशी संबंधित महत्वाची बातमी आहे. ईपीएफओ खातेदाराने त्याच्या वारसाचे नाव जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. खातेदार आणि त्याच्या कुुटंबियाच्या दृष्टिने वारसदाराचे नाव जोडणे त्याच्याच हिताचे आहे. खातेदाराच्या पश्चात दावा निपटा-यासाठी वारसदाराचे नाव जोडणे आवश्यक आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ बॅलन्स चेक(PF Balance Check) करण्यासाठी ई-नॉमिनेशन (E-Nomination)  अनिवार्य केले आहे. वारसदाराचे नाव जोडले तरच खातेधारकांना पीएफ बॅलन्स बघता येईल आणि पासबूक बघता येणार आहे.

ई-नॉमिनेशनची मुदत वाढली

ईपीएफओने वारस जोडण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही तुमच्या वारसाचे नाव पीएफ अकाऊंटला जोडले नसेल तर त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास त्याचा तुम्हाला आणि कुटुंबियांना फायदा होईल. ही सुविधा सदस्य आणि त्याच्या कुटुंबियांसाठीच आहे. ई-नॉमिनेशन केल्यास वारसांना क्लेम (Claim) करताना अडचणी येणार नाहीत. तसेच वारसाला 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षणही प्राप्त होईल.  पीएफ खातेधारकांना नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) पीएफ खातेधारकांना नॉमिनी एड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  31 डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती.

तर होईल नुकसान

EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नसेल तर पीएफ रक्कम खात्यात अडकू शकते
खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाही.
दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement)  होणार नाही.

विम्याचे वारसदारांना संरक्षण

EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा मिळते.  एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत त्यांना विमा संरक्षण देण्यात येते.  या योजनेतंर्गत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा देण्यात येते. वारस नेमलेला नसताना पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. खातेधारकाने त्याची पत्नी, मुले, आई-वडिल यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाईन पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे अनिवार्य आहे.

वारसदार जोडण्याची प्रक्रिया

ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्या
त्यानंतर  ‘Service’ हा पर्याय निवडा
पुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करा
आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा.  सॅलरी स्लीप (Salary Slip) वरही हा क्रमांक असतो.
‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा
नॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा
त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा
family declaration  या पर्यायावर या
‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा
‘Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक भरा
‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.
‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल.
हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल.
ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Wagon R अवघ्या 1.30 लाखात खरेदीची संधी

ऑफ रोड कार ते न्यू लँड क्रूझर, Maruti, Toyota यावर्षी एकापेक्षा एक गाड्या लाँच करणार

2022 Skoda Kodiaq SUV भारतात लाँच, Hyundai Tucson आणि Jeep Compass ला टक्कर