KYC update | बँक खातेदारांचा जीव भांड्यात; रिझर्व्ह बँकेने KYC अद्ययावत करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली

| Updated on: Dec 30, 2021 | 3:12 PM

बँक खातेधारकांना रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला. या वर्षाच्या सरतेशेवटी KYC अद्ययावत न करणा-या खातेधारकांचे खाते बंद करण्यात येणार होते. मात्र आता केवायसी अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.

KYC update | बँक खातेदारांचा जीव भांड्यात; रिझर्व्ह बँकेने KYC अद्ययावत करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली
आरबीआय.
Follow us on

बँक खातेधारकांना रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा दिलासा दिला. केवायसी अद्ययावत  (Update) न करणा-या ग्राहकांची खाती गोठविण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. त्यासाठीच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आला होता. त्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. केवायसी अपडेट करण्यासाठी अवघे 24 तास उरले असतानच रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निर्णयात सुधारणा केली. बँकेने केवायसी अद्ययावत करण्याची मुदत पुढील 31 मार्च 2022 रोजीपर्यंत वाढवली. तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे बँक खाते बंद न करण्याच्या सूचना बँकेने दिल्या आहेत. कोविड आणि ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गैरवापर टाळण्यासाठी केवायसी

सध्या ऑनलाईन व्यवहारात फसवणूक वाढली आहे. त्यासाठी बँका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही करत आहेत. मात्र अनेकदा ग्राहकाच्या खासगी माहितीच्या आधारे त्यांना गंडा घालण्यात येतो. त्यामुळे बँका ग्राहकांची ओळख पक्की करण्यासाठी ती सतत अदययावत करत असते. ग्राहकाचा अधिकृत मोबाईल क्रमांक, त्याचे छायाचित्र, पत्ता, आधारकार्ड याविषयीची माहिती अपडेट करण्यात येते. बँकिंग सेवांचा गैरवापर टाळण्यासाठी बँका केवायसी अपडेट करतात. जे ग्राहक या ऑनलाईन जोखीमेचे शिकार होतात. त्यांना दर दोन वर्षांनी ही प्रक्रिया पार पाडावी लागते. तर इतर ग्राहकांसाठी हीच मुदत 8 वर्षांची आहे. कमी जोखीम असणा-या गटातील ग्राहकांचे केवायसी 10 वर्षांनी एकदा अपडेट करावे लागते. आता तर व्हिडिओ केवायसीमार्फतही ग्राहक बँक खाते उघडू शकतो. विशेष म्हणजे सायबर भामटे बँकेतून बोलत असल्याचे भासवत तुमची खासगी माहिती काढून घेतात, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी ही जाणून घेतात आणि खाते रिकामे करतात. तेव्हा अशा कोणत्याही कॉलवर तुमची खासगी माहिती सांगू नका. मोबाईलवर आलेला ओटीपी ही सांगू नका.

ई-मेल आणि लिंकचा वापर

केवायसी अपडेट करण्यासाठी अनेक बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणले आहे. कोविड मधील सुरक्षितता लक्षात घेता अनेक बँकांनी त्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठीची कागदपत्रे त्यांच्या अधिकृत ई-मेलद्वारे अपडेट करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तर पोस्टाद्वारे संबंधित पत्त्यावर तुम्ही कागदपत्रे पाठवून केवायसी अद्ययावत करू शकता. आयडीबीआय बँकेने केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक उपलब्ध करुन दिली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँकेने केवायसी अपडेट करण्याची मुदत वाढविल्याने ग्राहकांनी न आळसावता त्वरीत केवायसी अपडेट करणे गरजचे आहे. हे त्यांच्या खात्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Vidarbha hailstorm | विदर्भाला दोन दिवस गारपिटीने झोडपले, पिकांच्या नुकसानीसह तीन ठार; विजय वडेट्टीवार म्हणतात, नुकसानीचे पंचनामे करणार

Mahajyoti | जे कृषी विद्यापीठाला जमलं नाही ते महाज्योतीनं केलं; काय आहे हा 15 हजार एकरवरील प्रकल्प?

The Kidtastic Bhagavad Gita | नागपुरातील दहा वर्षांच्या काव्य अग्रवालने उलगडला भगवद् गीतेचा अर्थ; समजून घ्या किडटास्टिक गीतेत काय लिहिले?