मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (फसवणूकीचे वर्गीकरण आणि व्यावसायिक बँकांद्वारे अहवाल आणि निवडक वित्तीय संस्था) निर्देश 2016 चे पालन न केल्याबद्दल एसबीआयने दंडात्मक कारवाई केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, एसबीआयने व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांच्या वतीने ग्राहकांसोबत फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले आहे. आरबीआयने म्हटले आहे की बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम -47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून त्याने हा दंड लावला आहे. तसेच ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित असल्याचे सांगितले. बँकेने ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता प्रभावित होणार नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ((Indapur Urban Cooperative Bank) 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.
संंबंधित बातम्या:
रिझर्व्ह बँकेकडे नाण्यांचा ढीग, ग्राहकांना नाणी द्या आणि इंन्सेन्स्टिव मिळवा, बँकांना खास ऑफर
मुंबई आणि बारामतीच्या ‘या’ सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?