तुमचं बजेट 10 हजारापेक्षा कमी आहे? चिंता नको… ‘या’ कंपनीचे स्मार्टफोन बिनधास्त खरेदी करा

| Updated on: Mar 23, 2022 | 11:55 PM

बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळतात. हल्ली मोबाईलच्या किंमती जरी वाढल्या असल्या तरी अनेक ब्रँड आपल्या ग्राहकांच्या खिशाला ताण पडू नये याची काळजी देखील घेतात. Samsung, redmi, realme आणि oppo ने स्वस्त दरामध्ये बाजारात स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत.

तुमचं बजेट 10 हजारापेक्षा कमी आहे? चिंता नको... या कंपनीचे स्मार्टफोन बिनधास्त खरेदी करा
mobile market
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः हल्ली आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या ब्रँड चे मोबाईल फोन वापरत असतात. भारतीय मोबाईल बाजारांमध्ये (Indian Mobile market) खूप सारे स्मार्टफोन उपलब्ध देखील आहेत. या प्रत्येक स्मार्टफोनचे या मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात (mobile technology field) स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. बाजारात प्रत्येक आठवड्यात एखादा मोबाईल नव्याने आलेला पाहायला मिळतो.तरुण मंडळी नवीन आलेल्या मोबाईलचे अपडेट नेहमी ठेवत असतात. जर आपल्याला मोबाईल फोन विकत घ्यायचा असेल तर आपल्या पैकी अनेकजण स्मार्ट फोनचे स्पेसिफिकेशन नक्की पाहतात. मोबाईलची किंमत, बॅटरी,कॅमेरा,ऑपरेटिंग सिस्टम ,नवीन फीचर्स या सगळ्या गोष्टी पाहूनच मोबाइल फोन विकत घेतला जातो. मोबाईल स्मार्ट फोनचे दर गगनाला भिडत असले तरी बाजारात काही अग्रगण्य ब्रँड्स ने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. हे ब्रँड्स आपल्या ग्राहकांचा नेहमी विचार करत असतात. सॅमसंग (Samsung), रेडमी (Redmi), रियलमी (Realme) आणि ओप्पो (OPPO) या ब्रँड्स चे अगदी स्वस्त दरात उपलब्ध होणारे मोबाईल बाजारात उपलब्ध आहे. आपणास सांगू इच्छितो की,ज्या ग्राहकांचे बजेट 10,000 रूपयांपेक्षा कमी आहे त्याच्या साठी देखील वरील ब्रँड्सचे मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy A03 Core

जर तुम्हाला सॅमसंग चा स्मार्टफोन मोबाइल विकत घेण्याची इच्छा आहे आणि तुमचे बजेट जर कमी असेल तर अशावेळी बाजारामध्ये सॅमसंगचा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा Galaxy A03 Core स्मार्टफोन उपलब्ध आहे. या मोबाईल फोनची किंमत ऑफिशियल वेबसाईटवर 7999 रुपये आहे. या मोबाईल फोन मध्ये 6.5 इंच चा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या मोबाईल फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देखील उपलब्ध आहे.

mobile market

OPPO A16k

ओप्पो हा ब्रँड त्याच्या कॅमेरा साठी आणि ऑपरेटिंग सिस्टम साठी प्रामुख्याने ओळखला जातो. जर तुमचे बजेट कमी असेल तर अशावेळी चिंता अजिबात करू नका कारण की बाजारामध्ये OPPO A16k मॉडेल तुमच्यासाठी उपलब्ध आहे. या मॉडेलची किंमत नऊ हजार 9990 रुपये आहे. या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या मोबाईल मध्ये एक टिबी पर्यंत एसडी कार्ड एक्स्पांड केले जाऊ शकते. या मोबाईल फोन मध्ये बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

REDMI 9i Sport

हल्ली रेडमी मोबाईल देखील तरुणांच्या पसंतीस उतरलेला आहे. बाजारांमध्ये रेडमीचे वेगवेगळे मोबाईल उपलब्ध असतात. एखादा रेडमी चा नवीन मोबाईल मॉडेल लॉन्च झाला की काही क्षणांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मोबाइल विकला जातो. जर तुम्हाला रेडमी चा मोबाईल विकत घ्यायचा असेल तर बाजारामध्ये तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये REDMI 9i Sport हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मोबाईलची किंमत 8799 इतकी आहे. या मोबाईल स्पेसिफिकेशन देखील चांगले आहे.या मोबाईल फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम दिली गेली आहे.या मोबाईल ला 5000 mAh इतकी क्षमता असली बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi

realme C21Y

बाजारामध्ये रेडमी ब्रँडच्या जोडीलाच रियलमी हा ब्रँड देखील हल्ली प्रसिद्ध आहे. हा ब्रँड्स त्याच्या कार्यक्षमते मुळे प्रामुख्याने ओळखला जातो. बाजारामध्ये realme C21Y हा मॉडेल उपलब्ध आहे. या मोबाईल फोनची किंमत 9499 रुपये आहे.या मोबाईल फोन मध्ये 3जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या मोबाईल फोन ला 6.5 इंच एचडी प्लस चा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

Real mi

संबंधित बातम्या

Video : महात्मा गांधींबाबत बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य! काय म्हणाले बंडातात्या?

पहिलीची मुलं होणार हुशार; एका पुस्तकात चार विषय; ‘सृजन बालभारती’पुस्तक येणार हातात

ड्रायव्हिंग लायसन्सला डिजिलॉकर सोबत जोडणे झाले अगदी सोप्पे, या प्रक्रियांचा करा वापर !