मुंबई : मुंबईत घर घेण्याच्या स्वप्न पाहणा-यांसाठी खुषखबर, मुंबईत घराच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतातील इतर शहरांच्या मानाने ही घसरण जास्त आहे. त्यामुळे मुंबईत घर खरेदीला लवकरात लवकर मुहुर्त लावणे गरजेचे आहे. मुंबईतील घरांच्या किंमतीत यंदा 1.8 टक्क्यांची घसरण झाली. विशेष म्हणजे 2021 या सरत्या वर्षात जगातील 150 शहरांतील घरांच्या किंमतीत सरासरी 10.6 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. भारतात मुंबई पेक्षा इतर शहरात घर घेणे महाग झाले असले तरी मुंबईत तुम्ही हक्काचे घर स्वस्तात मिळवू शकता.
नाइट फ्रँक इंडिया या संस्थेने 2021 च्या तिसऱ्या तिमाहीचा ग्लोबल रेसिडेन्शिअल सिटीज इंडेक्सचा अहवाल नुकताच जाहीर केला, त्यात जगभरातील 93 टक्के शहरांतील घरांच्या किंमती वाढल्याचे दिसून आले. मात्र मुंबईत या किंमतीत घसरण झाली आहे. तर हैदराबादमधील घरांच्या किंमती 2.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दिल्लीतील घरांच्या किंमतीही वाढल्या आहेत. हैदराबादसह चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या किमती वाढल्या आहेत. बंगळुरू, दिल्ली, पुणे आणि मुंबई या शहरांमधील घरांच्या किमती घटल्या आहेत.
जागतिक 150 निवासी शहरांच्या यादीत मुंबईने सर्वात स्वस्त घर देणारे शहर म्हणून नाव नोंदविले आहे. जगभरातील 150 शहरांतील घरांच्या किमतीत सरासरी 10.6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. जागतिक क्रमवारीत मुंबईची 146 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यावर्षी जगातील 93 टक्के शहरांमधील घरांच्या किमती वाढल्या आहेत. यातील 44 टक्के शहरांत यंदा दोन अंकी दरवाढ नोंद केली आहे. तुर्कीच्या इझमीर शहरातील घरांमध्ये यंदा तब्बल 34.8 टक्के एवढी सर्वोच्च वाढ नोंद झाली आहे. तर न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरात 33.5 टक्के वाढ झाली असून मलेशियातील क्वालालंपूर मध्ये घरांच्या किमतीत 5.7 टक्के एवढी घट नोंदविण्यात आली.
शहर वाढ(टक्क्यात) जागतिक क्रमवारी
हैदराबाद 2.5 128
चेन्नई 2.2 131
कोलकत्ता 1.5 135
अहमदाबाद 0.4 139
बंगळुरु 0.2 140
दिल्ली 0.7 142
पुणे 1.5 144
मुंबई 1.8 146
बँकांचे व्याजदर कमी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या दोन लाटेमुळे जागतिक बाजारपेठेत कमालीची मरगळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बाजार स्थिरावत आहे. अशातच पुन्हा ओमायक्रॉनच्या नव्या संकटाने दरवाज्यावर थाप दिली आहे. महागाईचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्राला बसला असला तरी रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागत असल्याने आणि बांधकाम क्षेत्रातील स्पर्धेमुळे घराच्या किंमती स्थिर ठेवण्याच्या अथवा कमी करण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. घराची विक्रीला गती देण्यासाठीही घराच्या किंमती कमी करण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
आज आयटीआर दाखल करण्याचा शेवटचा दिवस; …तर मध्यरात्रीपासून भरावा लागणार पाच हजारांचा दंड
बँक खात्यातून रक्कम चोरी झालीये?, चिंता करू नका; ‘या’ हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क