कारप्रेमींमध्ये रॉल्स रॉयसच्या कारबद्दल (Rolls Royce car) खूप आकर्षण असते. रॉल्स रॉयस कार निर्माता कंपनी आपल्या महागड्या व आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिध्द आहे. सिल्वर घोस्ट, व्रेथ आणि सिल्वर शॅडो हे काही प्रीमिअम मॉडेल्सपैकी एक आहेत. रॉल्स रॉयसच्या कार सर्वाधिक महागड्या असण्याचे मोठे कारण म्हणजे बिस्पोक डिपार्टमेंट आहे, जे लक्झरी कारप्रेमींना ‘कस्टमाइजेशन’(Customization) ची सुविधा देते. या सुविधेचा लाभ घेऊन कार मालकांना त्यांना पाहिजे असलेल्या सर्व सुविधा कारमध्ये उपलब्ध होण्यास मदत होत असते. लिमोजिन आणि कूपच्या व्यतिरिक्त फेटम, घोस्ट, व्रेथ आणि कुलिनन आदी यांची करंट रेंज आहेत. या लेखातून रॉल्स रॉयसच्या अजून महागड्या (expensive) गाड्यांची माहिती घेणार आहोत.
हे रॉल्स रॉयसचे सर्वात महागडे मॉडेल आहे. ही कार एका स्पेशल ग्राहकासाठी तयार करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, या मॉडेलच्या केवळ तीनच कार बनलेल्या आहेत. बोट टेल रॉल्स रॉयसचे कोचबिलड डिपार्टमेंटचे रिवाइव्ड मॉडेल आहे. या कारची खरी ओळख म्हणजे तिची लक्झरी डिझाईन आहे. यात दोन लांब टेल आहेत, ज्यात, एक पिकनिक सेटअपचाही सहभाग आहे. यात 6.7 लीटरचा ट्वीन टर्बो व्ही12 इंजीन आहे. यात इटालियन फर्निचर ब्रांड प्रोमेमोरियाचे लेदर स्टूल लावण्यात आले आहे. कारची किंमत अंदाजे 28 मिलियन डॉलर आहेत.
ही लक्झरी कार 2003 फेटम कूपवर आधारीत आहे. कंपनीला या गाडीला तयार करायला चार वर्षे लागलीत. या गाडीत लेदर आणि वूडचे पॅनल देण्यात आले आहे. गाडीच्या समोरील बाजूस टेडमार्क स्क्वायर ग्रील आहेत. याची अंदाजित किंमत 12.8 मिलियन डॉलर आहे.
रॉल्स रॉयसची ही अजून एक एक्सक्लूसिव्ह कार आहे. ही फेटम किंवा घोस्टसारखी मॉडर्न मॉडलवर आधारीत नसली तरी या गाडीला मोठी मागणी आहे. यात 2.0 लीटरचे दोन सिलेंडर इंजीन 10 एचपीच्या कारमधील एक वैशिष्ट्य आहे. याचा ट्राअँगुलर टोप रेडिएटर ट्रेडमार्क ब्रांडची एक वेगळी ओळख निर्माण करतो. याची किंमत अंदाजे 6.4 मिलियन डॉलर आहे.
ही कार ड्रायव्हरांना लक्षात घेउन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यातील समोरील सीटलाही मागील सीटांप्रमाणे आरामदायक बनविण्यात आले आहे. ही जगातील सर्वाधिक महागडया कार्सपैकी एक आहे. या कारला ‘द कोर्गी’ असे निकनेमदेखील देण्यात आले आहे. 2012 मध्ये गुडवुडमध्ये 6.4 मिलियन डॉलरमध्ये या कारची विक्री झाली होती.