मुंबई: सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली असून आता दोन्हींचा प्रवास वरच्या दिशेने सुरु आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहने वापरायची की नाही, असा प्रश्न सामान्यांसमोर उभा ठाकला आहे. अशावेळी फ्यूएल क्रेडिट कार्डस (Fuel Credit Cards) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरताना फ्यूएल क्रेडिट कार्डचा वापर केल्यास कॅशबॅक आणि फ्यूएल सरचार्जमधून सूट मिळते. अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना ही सुविधा देऊ केली आहे.
जर तुम्ही आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्डद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणजेच एचपीसीएलच्या पेट्रोल पंपावर इंधन खरेदी केल्यास तुम्हाला बिलावरील अधिभार माफ करण्यासह 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, एचपी पेद्वारे एचपीसीएल पंपवर पेमेंट केल्यावर 1.5 टक्के रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
जर तुम्हाला देखील इंधन खर्चावर पैसे वाचवायचे असतील तर BPCL SBI कार्ड सह-ब्रँडेड RuPay कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड सिद्ध होऊ शकते. या कार्डद्वारे, बीपीसीएल पेट्रोल पंपावर इंधनावर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांना 13X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, म्हणजेच प्रभावीपणे 4.25 टक्के व्हॅल्यूबॅकचा (1 टक्के अधिभार माफीसह) फायदा मिळेल.
इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊन तुम्ही एका वर्षात 71 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळवू शकता. हे क्रेडिट कार्ड इंधन खरेदीसाठी उत्तम कार्ड आहे. या कार्डाद्वारे इंडियन ऑईल पंपांकडून इंधन खरेदी केल्याने बक्षिसाच्या स्वरूपात अनेक फायदे मिळतात. हे रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) कधीही कालबाह्य होत नाहीत. इंडियन ऑईल पंपवर खर्च केलेल्या प्रत्येक 150 रुपयांसाठी 4 टर्बो पॉइंट्स उपलब्ध आहेत. इंधन पॉइंट्स रिडीम करून, ग्राहक वर्षाला 71 लिटर पर्यंत मोफत इंधन मिळवू शकतात.
इंडियन ऑईल एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे, ग्राहक आयओसीएल आउटलेटमध्ये ‘फ्यूल पॉइंट्स’ नावाचे रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात. जर तुम्ही या कार्डाद्वारे इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पैसे भरले तर तुम्हाला खर्चाच्या 5 टक्के इंधन गुण मिळतील. इंधन पॉइंट्स रिडीम करून, ग्राहक वर्षाला 50 लिटर इंधन मोफत मिळवू शकतात.
एसबीआय कार्ड वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कार्डावर बीपीसीएलच्या पेट्रोल पंप स्टेशनवर खर्च झालेल्या इंधन आणि ऑईलवर 7.25 टक्के कॅशबॅक (1 टक्के अधिभार माफीसह) आणि भारत गॅसच्या खर्चावर 6.25 टक्के कॅशबॅक उपलब्ध असेल.
स्टँडर्ड चार्टर्ड सुपर व्हॅल्यू टायटॅनियम क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल पंप स्टेशनवर इंधन खर्चावर 5% कॅशबॅक मिळवा. मात्र, यासाठी खर्च 2000 किंवा त्यापेक्षा कमी असावा. या ऑफरद्वारे तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 200 रुपये कॅशबॅक मिळवू शकता. एका व्यवहारात जास्तीत जास्त 100 रुपये कॅशबॅक मिळेल.
या कार्डावर तुम्हाला 4 टक्के कॅशबॅक मिळेल (1 टक्के अधिभार माफीसह) आणि एचपी वॉलेटवर 1.50% कॅशबॅक मिळेल.
इंडियन ऑईल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 20 रिवॉर्ड पॉइंट (4% व्हॅल्यूबॅक) मिळतील.
संंबंधित बातम्या:
आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?
Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा