मुंबई: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक SBI च्या काही सेवाबुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.
खरं तर, एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, प्रणालीच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. एसबीआयने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध असणार नाहीत.
या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर कोणतेही काम करु नये, असा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे. यापूर्वी 4 सप्टेंबर रोजी देखभालीच्या कामामुळे एसबीआयची योनो सेवा सुमारे 3 तास बंद होती. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखभाल केल्यामुळे एसबीआयने बँकिंग सेवा बंद केली होती. सहसा देखभाल काम रात्री केले जाते, त्यामुळे ग्राहकांना फारसा फटका बसत नाही.
देशातील आठ कोटी ग्राहक एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा अधिक लोक वापरतात. तर सुमारे 2 कोटी लोक मोबाईल बँकिंगचा वापर करतात. त्याच वेळी, योनोवर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे. या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience.#InternetBanking #OnlineSBI #SBI pic.twitter.com/5SXHK20Dit
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 14, 2021
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.
* तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करा.
* त्यानंतर ईएमआयच्या पर्यायांची निवड करा.
* त्यानंतर ईएमआयची रक्कम आणि कालवधी टाका.
* ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओके क्लिक करा, त्यानंतर POS मशीन तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे चेक करेल.
* यानंतर तुमची रक्कम ईएमआयमध्ये कन्व्हर्ट होईल.
* दुकानदार तुम्हाला ईएमआय आणि इतर तपशील असलेली स्लीप देईल, त्यावर सही करा.
संबंधित बातम्या:
डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कशी कन्व्हर्ट कराल?
रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
व्होडाफोन-आयडिया कंपनीसाठी बँका पुढे सरसावल्या, मोदी सरकारकडे खास मागणी