SBI Car Loan : SBIची बंपर ऑफर! मारुतीसह या 10 कंपन्यांच्या कार बुकिंगवर मिळवा सूट, कर्जही होणार स्वस्त

| Updated on: Apr 21, 2022 | 1:20 PM

SBI Yono App वर ग्राहक घरबसल्या चारचाकी घेण्यासाठी कर्जाचा अर्ज करू शकतात. कार बुक करताना ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स मिळत आहेत

SBI Car Loan : SBIची बंपर ऑफर! मारुतीसह या 10 कंपन्यांच्या कार बुकिंगवर मिळवा सूट, कर्जही होणार स्वस्त
एसबीआय कार लोन
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई :  जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) तुमच्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. एसबीआयच्या (SBI) या ऑफरच्या माध्यमातून मारुती सुझुकी, ह्युंदाई, रेनॉल्ट, टाटा मोटर्ससह 10 मोठ्या कंपन्यांची कार खरेदी सोपी झाली आहे. फक्त मोबाईल वरील काही मिनिटांच्या खेळीनंतर तुम्हाला तुमची आवडती कार बूक करता येईल. एसबीआय योनो अ‍ॅपच्या (SBI Yono App) माध्यमातून कार बुकिंगवर ग्राहकांवर अनेक आकर्षक ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. ग्राहकांना प्रक्रिया शुल्कात (Processing Fee) सवलत देण्याबरोबरच कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध होणार आहे. एसबीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कर्जासाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही

जर तुम्ही सर्व नियम आणि अटींमध्ये फिट बसत असाल तर तुम्हाला कर्जासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचीही गरज नाही आणि तुम्ही घरबसल्या एसबीआयच्या योनो मोबाईल अ‍ॅप (SBI Yono ) च्या आधारे कर्जासाठी अर्ज करू शकता.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. बँकेने ट्विट केले की, “Ride with Pride!” योनोच्या माध्यमातून तुमच्या ड्रीम कार बुक करण्याच्या खास ऑफरचा आनंद घ्या. यासाठी एसबीआयचे योनो अ‍ॅप डाऊनलोड करा.

कार लोनसाठी अर्ज करण्याचे अनेक फायदे आहेत.

बँकेच्या म्हणण्यानुसार, एसबीआय योनो अ‍ॅपवरून कार लोनसाठी अर्ज केल्यास ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. त्यांना7 .25 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने कार लोन मिळेल. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 7 वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे. स्टेट बँकेच्या या कार लोन ऑफर अंतर्गत तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंट चार्जेसच्या स्वरूपात कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

असा करा अर्ज

  1. कार लोनसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी एसबीआय योनो अ‍ॅपवर लॉगिन करा.
  2. त्यानंतर शॉप ऑर्डरवर क्लिक करा
  3. मग ऑटोमोबाईल श्रेणीत जा

या कार कंपन्यांवर आकर्षक ऑफर

एसबीआयच्या ट्वीटनुसार, ग्राहकांना 10 मोठ्या कार कंपन्यांच्या बुकिंगवर ऑफर दिली जात आहे. प्रत्येक कार कंपनीवर बँकेची वेगवेगळी ऑफर आहे. ह्युंदाईच्या निवडक मॉडेल्सवर प्रायोरिटी डिलिव्हरी दिली जात आहे. त्याचबरोबर महिंद्रा SYOUVमध्ये 3 हजार रुपयांचे एक्सेसरीज मोफत मिळत आहे. मर्सिडीज बेंझला २५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रोख लाभ मिळणार आहे. डॅटसनवर 4,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, नंतर रेनॉल्टवर 5,000 रुपयांपर्यंत फ्री अ‍ॅक्सेसरी ऑफर देण्यात आली आहे.

इतर बातम्या

bjp mla ganesh naik : अटकपूर्व जामिनासाठी गणेश नाईकांची धावाधाव, ठाणे सत्र न्यायालयात अर्ज, नाईकांवर अटकेची टांगती तलवार

Devendra Fadnavis: वसुली रॅकेटमुळे पोलिसांच्या बदल्या केल्या का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Big News: टबलात्कार केल्याची तक्रार देईन’ असं म्हणून धनंजय मुंडेंना धमकावणाऱ्या महिलेला अटक