SBI FASTag | स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फास्टॅग ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. बऱ्याचदा टोलनाक्यावर पोहचल्यावर फास्टॅगमध्ये (FASTag)रक्कम शिल्लकच नसल्याचे समोर येते. अशावेळी ग्राहकांना एका एसएमएसवर (SMS) त्यांच्या फास्टॅग खात्यातील रक्कमेची माहिती अचूक मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना या सुविधेची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 7208820019 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. ग्राहकांना लागलीच त्यांच्या फास्टॅग खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.
स्टेट बँकच्या ट्विटनुसार,एसबीआय फास्टॅग ग्राहकांनी त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन FTBAL असे लिहून 7208820019 या क्रमांकावर पाठवावे. त्यानंतर काही सेकंदात त्यांना फास्टॅगच्या बॅलन्सची माहिती मिळेल.
फास्टॅग एक रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आरएफआयडी या तंत्रज्ञानावर आधारीत डिवाईस आहे. या तंत्रज्ञानाआधारे टोलनाक्यावर आपोआप टोल जमा करण्यात येतो.
फास्टॅगचे स्टीकर गाड्यांच्या दर्शनी भागावर चिटकवलेले असते. 15 जानेवारी 2020 रोजीपासून खासगी आणि व्यावसायिक वाहनधारकांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे.
फास्टॅग एक प्रीपेड पेमेंट पद्धत आहे. ही पेमेंट सेवा ग्राहकाच्या बचत खात्याशी संलग्नीत असते. त्यामुळे टोल नाक्यावर रीडर, वाहनावरील स्टीकर रीड करते आणि तुमच्या खात्यातून रक्कम आपोआप कपात होते.
जर तुम्ही एसबीआयचा फास्टॅग घेऊ इच्छित असाल तर , तुम्हाला 1800110018 या कस्टमर केअर क्रमांकवर संपर्क करावा लागेल. एसबीआय फास्टॅग पीओएस लोकेशनची तुम्हाला माहिती देण्यात येईल. तसेच तुम्ही ई-कॉमर्स संकेतस्थळावरुन ही SBI फास्टॅग खरेदी करता येईल.