ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा IFSC कोड टाकलात तर काय होईल?

| Updated on: Jul 31, 2021 | 12:01 PM

Online Transfer | तुमच्याकडून अशी चूक झाल्यास घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम तुम्ही एसबीआय बँकेशी संपर्क साधावा. तुम्ही चुकीच्या अकाऊंट नंबरला पैसे ट्रान्सफर केले असतील तर तुमच्या होम ब्रांचकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वप्रथम होम ब्रांचशी संपर्क साधून ही प्रक्रिया थांबवली पाहिजे.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा IFSC कोड टाकलात तर काय होईल?
Follow us on

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अलीकडच्या काळात ऑनलाईन आणि डिजिटल व्यवहारांवर अधिकाअधिक भर दिला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक आपसूकच डिजिटल बँकिंगकडे वळाले आहेत. मात्र, हे व्यवहार करताना अनेकदा चुका होतात. अनेक ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा अकाऊंट नंबर किंवा IFSC कोड टाकतात. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या खात्यामधून पैसे वजा होतात, मात्र ते योग्य ठिकाणी पोहोचत नाहीत.

मात्र, तुमच्याकडून अशी चूक झाल्यास घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम तुम्ही एसबीआय बँकेशी संपर्क साधावा. तुम्ही चुकीच्या अकाऊंट नंबरला पैसे ट्रान्सफर केले असतील तर तुमच्या होम ब्रांचकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वप्रथम होम ब्रांचशी संपर्क साधून ही प्रक्रिया थांबवली पाहिजे.


मात्र, पैसे चुकीच्या खात्यात गेले तर त्याला बँक जबाबदार राहणार नाही, असेही एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वीच बेनिफिशिअरी अकाऊंटचा तपशील पडताळून पाहावा. मात्र, तरीही चूक घडल्यास होम ब्रांच किंवा बेनिफिशिअरी बँकेशी संपर्क साधावा.

एसबीआय योनो केवळ नोंदणीकृत क्रमांकासह वापरण्यास सक्षम

या नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आपण एसबीआयच्या ऑनलाईन बँकिंगसाठी योनो अॅपचा वापरल्यास नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून योनो अॅप खात्यात प्रवेश करू शकाल. अन्य कोणत्याही मोबाईल नंबरवरून एसबीआय योनो वापरून आपण खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. यासाठी एसबीआयने ग्राहकांना एसबीआय योनो वापरताना त्यांच्या मोबाईल खात्यात नोंदणीकृत तोच मोबाईल नंबर वापरण्याचा सल्ला दिलाय.

संबंधित बातम्या:

SBI ने सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी Yono Lite App वर जोडले नवे फीचर्स, फायदा काय?

SBI चे इंटरनेट बँकिंगसाठी दोन ॲप्स, दोघांमधील फरक काय? तुमच्यासाठी कोणते योग्य?