SBI IMPS : 1 फेब्रुवारीपासून तीन नियम बदलणार, तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार, जाणून घ्या

| Updated on: Jan 30, 2022 | 1:14 PM

रेल्वे, पोस्ट ऑफिस (Post Office) यासंबंधी नियम आणि एलपीजीच्या (LPG Rates) किमतीमध्ये होणारे बदल यासारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करत असतात.

SBI IMPS : 1 फेब्रुवारीपासून तीन नियम बदलणार, तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार, जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: बँकांच्या नियमांमध्ये (Bank Rules) बदल झाल्यास त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असतो. याशिवाय रेल्वे, पोस्ट ऑफिस (Post Office) यासंबंधी नियम आणि एलपीजीच्या (LPG Rates) किमतीमध्ये होणारे बदल यासारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करत असतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये नियमातील बदल महिन्याच्या सुरुवातीला लागू केले जातात. प्रत्येक महिन्याला कोणत्या ना कोणत्या नियमांमध्ये बदल होत असतात त्याप्रमाणे या वेळी देखील एक फेब्रुवारीपासून काही नियम बदलत आहेत. काही सेवांच्या दरांमध्ये बदल होणार आहेत यासंबंधी माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्टेट बँकेच्या आयएमपीएस सेवेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. तर,1 तारखेला जाहीर होणाऱ्या एलपीजी गॅसच्या किमतींवर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याने त्या वेळी देखील होणाऱ्या बदलांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार असल्याचे दिसून येते.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आयएमपीएसचे नियम बदलले

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या नियमांमध्ये बदल केला आहे. 1 फेब्रुवारी पासून स्टेट बँकेने आयएमपीएसच्या दरांमध्ये बदल केला आहे. दोन लाख रुपये पर्यंतच्या आयएमपीएस सेवेवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून आयएमपीएसची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवल्यानंतर स्टेट बँकेने देखील त्यांच्या आयएमपीएसची मर्यादा वाढवून पाच लाख केली आहे. एखाद्या ग्राहकानं स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँक किंवा डिजिटल माध्यमातून पाच लाखांचा आयपीएस केलं तर त्याच्यापासून शुल्क घेतले जाणार नाही.

स्टेट बँकेच्या शाखेतून आयएमपीएस केल्यास शुल्क लागणार

कोणत्याही व्यक्तीने जर स्वतः बँकेत उपस्थित राहून आयएमपीएस सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाला एक हजार रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागणार नाही. 1 हजार रुपयांपेक्षा जास्त ते 10 हजार रुपये पर्यंतच्या व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावी लागेल. 10 हजार रुपये 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी 4 रुपये आणि जीएसटी शुल्क, 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत 12 रुपये शुल्क आणि जीएसटी, 2 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या सेवेसाठी 20 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावी लागेल.

एलपीजीच्या किमतीमधील बदलाकडे लक्ष

भारतात कोट्यावधी लोक घरगुती गॅसचा वापर जेवण बनवण्यासाठी करतात. त्याच्या बदलणाऱ्या किमतींवर सर्वांचे लक्ष असतं. ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसचे दर जाहीर करतात. दिल्लीत सध्या विना अनुदानित घरगुती गॅस ची किंमत 899, कोलकत्ता मध्ये 926, मुंबईमध्ये 899, चेन्नई मध्ये 915 रुपये आहे. तर, व्यवसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत 1998 रुपये, कोलकातामध्ये 2076, मुंबईमध्ये 1948 आणि चेन्नईमध्ये 2131 रुपये शुल्क द्यावं लागतं.

इतर बातम्या :

Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन

Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन

 

SBI IMPS rates changes gas rates will change from 1 February 2022 on the day of Union Budget 2022