ग्राहक हितासाठी एसबीआय करणार व्यवहारांमध्ये बदल, ‘हे’ नियम पुढील महिन्यापासून बदलणार 

| Updated on: Jan 14, 2022 | 1:53 PM

IMPS, NEFT आणि RTGS हस्तांतरणासारख्या ऑनलाईन व्यवहारांसाठी एसबीआयचे नवीन नियम पुढील महिन्यापासून लागू होतील. ग्राहकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसबीआयने (SBI) पुढाकार घेतला आहे.इंटरनेट बँकिंग वापर आणि डिजिटल बँकिंग  अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

ग्राहक हितासाठी एसबीआय करणार व्यवहारांमध्ये बदल, हे नियम पुढील महिन्यापासून बदलणार 
स्टेट बँक ऑफ इंडिया
Follow us on

मुंबई: एसबीआयने (SBI) IMPS, NEFT आणि RTGS हस्तांतरणासारख्या ऑनलाईन व्यवहारांसाठी एसबीआयचे नवीन नियम आणले आहेत. इंटरनेट बँकिंग वापर आणि डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२२ पासून हा बदल लागू होत आहे. या बदलामुळे खातेदारांना IMPS व्यवहार 2 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत आहेत.

एसबीआयने याविषयी अधिकृत निवेदन दिले आहे.  डिजिटल पद्धतीने केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या आयएमपीएस व्यवहारांवर (उदाहरणार्थ, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि योनो) कोणतेही सेवा शुल्क आकारण्यात येणार नाही.वापरकर्त्यांना इंटरनेट बँकिंग वापरण्यास आणि डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित व सुकर होण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.

फेब्रुवारी 2022 पासून नियमांत बदल 

1) एसबीआय IMPS शुल्क : ऑनलाइन मोड

5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर, इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या कोणत्याही आयएमपीएस व्यवहारावर कोणतेही सेवा शुल्क किंवा जीएसटी (GST) आकारला जाणार नाही.

योनो ॲपद्वारे केलेल्या व्यवहारांचाही या सवलतीत  समावेश आहे. जे ग्राहक योनो ॲपद्वारे  व्यवहार करतात, त्यांना सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

2) एसबीआय IMPS शुल्क: ऑफलाइन मोड

1,000 रुपयांपर्यंत: शुल्क नाही

1,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 10,000 रुपयांपर्यंत: 2 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

10,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 1,00,000 रुपयांपर्यंत: 4 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

1,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 2,00,000 रुपयांपर्यंत: 12 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 5,00,000 रुपयांपर्यंत (नवीन स्लॅब) : 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

 

3) एसबीआयसाठी NEFT सेवा शुल्क: ऑनलाइन मोड

एसबीआय कोणत्याही NEFT व्यवहारांवर, सेवा शुल्क वा कर हे दोन्ही आकारणार नाही. योनो ॲपसह इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे जाणारे व्यवहार, जरी  2 लाख रुपयांपेक्षा जास्त असले तरी सेवा शुल्क किंवा जीएसटी आकारण्यात येणार नाही.

4) एसबीआयसाठी NEFT सेवा शुल्क: ऑफलाइन मोड

10,000 रुपयांपर्यंत: 2 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

10,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 1,00,000 रुपयांपर्यंत: 4 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

1,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 2,00,000 रुपयांपर्यंत: 12 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक: 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

 

5) एसबीआयसाठी RTGS सेवा शुल्क: ऑनलाइन मोड

कोणत्याही RTGS व्यवहारावर कोणताही सेवा शुल्क किंवा जीएसटी आकारला जाणार नाही. योनो ॲपसह इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे

व्यवहार केला तरी आणि हा व्यवहार  5 लाख रुपयांपेक्षा जास्त असला तरी सेवा शुल्क आकारण्यात येणार नाही.

6) एसबीआयसाठी RTGS सेवा शुल्क : ऑफलाइन मोड

2,00,000 रुपयांपेक्षा अधिक आणि 5,00,000 रुपयांपर्यंत: 20 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

5,00,000 रुपयांपेक्षा अधिक: 40 रुपये सेवा शुल्क + जीएसटी

संबंधित बातम्या

विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम

‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं: सलग पाचव्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, टाटा स्टील चकाकले!

टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!