नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता तब्बल 2 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. कारण, एसबीआयमध्ये खाते असलेल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांचा विमा मोफत मिळत आहे. बँकेतील जनधन खातेधारकांना ही सुविधा दिली जात आहे. एसबीआयच्या ज्या ग्राहकांकडे रुपे डेबिट कार्ड असेल त्यांना 2 लाख रुपयांचा आकस्मिक वीमा मिळेल. याशिवाय, या ग्राहकांना मृत्यू विमा आणि इतर लाभही मिळू शकतात.
या योजनेतंर्गत तुमचा भारताबाहेर अपघात झाला तरी तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळेल. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील.
एसबीआय बँकेतील बेसिक सेव्हिंग अकाऊंट जनधन योजनेतील खात्यात ट्रान्सफर होऊ शकते. ज्यांच्याकडे जनधन खाते आहे त्यांना रुपे कार्डा मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांसाठी विमा राशी एक लाख रुपये इतकी असेल. तर त्यानंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
जनधन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. ही योजना 2014 साली सुरु झाली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे बँकेत खाते असावे या उद्देशाने शुन्य अनामत रक्कम असलेली जनधन खाती उघडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे देशातील गरीब आणि कष्टकऱ्यांना विमा, पेन्शन आणि सरकारी योजनांचे लाभ मिळणे सुलभ झाले होते.
संबंधित बातम्या:
पोस्टमन घरी येऊन आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणार; आता आधार केंद्रात जाण्याची गरज नाही
1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबधी ‘हे’ नियम बदलणार, काय होणार परिणाम?