मुंबई : म्युच्युअल फंड (Mutual funds) कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालत असलेल्या क्रिप्टोपासून (Cryptocurrency) चार हात दूर राहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे. क्रिप्टो या ऑनलाईन चलनात अनेक भारतीयांनी गुंतवणूक केली आहे. मात्र चलनाच्या विश्वासहर्तेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात आता सेबीने म्युच्युअल फंडांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केली आहे. सेबीच्या (SEBI) बोर्डाची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (NII) मध्ये 2 ते 10 लाखांसाठी 33 टक्के कोटा आरक्षित करण्यात आआला आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या अर्जांसाठी 67 टक्के कोटा राखीव असेल. 1 एप्रिल 2022 रोजीपासून हा नवा नियम लागू असेल. (SEBI asks mutual funds not to invest into crypto Until the Regularity Clarity)
कम्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) आणि Cfintech या दोघांनी म्युच्युअल फंड हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. ही कंपनी म्युच्युअल फंडाविषयीच्या सेवा पुरवते. बँक खाते बदल, मोबाईल क्रमांक बदल, ई-मेल आयडीतील बदल याविषयीच्या सेवा MF Central पुरविते. याविषयीचे अॅपही तयार करण्यात आले असून लवकरच ते प्ले-स्टोअरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
सेबीचे संचालक अजय त्यागी यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड कंपन्यांना क्रिप्टो करन्नसीमध्ये गुंतवणुकीची परवानगी नाकारण्यात आली आहे. क्रिप्टो संबंधित कंपनी वा परदेशी कंपनीत फंड्स ऑफ फंड्स नुसार म्युच्युअल फंडला गुंतवणुकीची मान्यता देण्यात आलेली नाही. जोपर्यंत क्रिप्टोसंदर्भात धोरण ठरविण्यात येत नाही. तोपर्यंत म्युच्युअल फंडांनी क्रिप्टोपासून चार हात दूर रहावे असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या
फार्मा कंपनीचे स्टॉक पळणार सुसाट, करा गुंतवणूक व्हा मालामाल!
(SEBI asks mutual funds not to invest into crypto Until the Regularity Clarity)