नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तुंमधील अत्यंत महत्वाचा भाग असलेला सेमीकंडक्टरचा (Semiconductor) जागतिक बाजारपेठेत (Markets) सध्या जाम तुटवडा आहे बरं का. त्यामुळे आपल्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झालेल्या स्मार्टफोन्सपासून तर इतर इलेक्ट्रॉन्सिक्स (Electronics) वस्तुंच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे. त्यातच ख्रिसमस आणि नवीन वर्ष, तसेच आगामी सणांमध्ये या वस्तुंची मागणी वाढणार आहे. अशावेळी उत्पादनाचा आणि डिलिव्हरीचा ताळमेळ बसविण्यात उशीर होणार आहे. त्यामुळे आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू उशीरा मिळण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर कोविड-19 चा मोठा परिणाम झाला आहे. अनेक उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. नवीन चारचाकी गाड्यांवर अगोदरच वेटिंग आहे. या नव्या संकटामुळे कारची डिलिव्हरी पण उशीरा मिळण्याची शक्यता आहे. कारप्रेमींना 6 ते 7 महिने वेटिंग करावे लागण्याची शक्यता आहे. जून 2022 पर्यंत ही समस्या राहण्याची शक्यता काही रिपोर्टसमध्ये वर्तविण्यात आली आहे. चिप आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन घटल्याचा हा परिणाम आहे.
पूर्वी कारमध्ये अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत नगण्य होता. मात्र डिजिटल युगात कारची फिचर्सही बदलली आहेत. जीपीएस, ब्लूटूथ, व्ही2एक्स, एडिएएस ड्रायव्हिंग आणि इतर अनेक फिचर्ससाठी सेमीकंडक्टर आणि चीपची आवश्यकता असते. आता त्याचे उत्पादनच प्रभावित झाल्याने कारची डिलिव्हरी उशीरा मिळण्याची दाट शक्यता आहे.
कारसोबतच रोजच्या घरगुती इ्लेस्क्ट्रॉनिक्स ब्रँडवरही लेटमार्क पडला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि फ्रीज या वस्तुंमध्ये सेमिकंडक्टरचा वापर होतो. त्यांच्या डिलिव्हरीवर पण याचा परिणाम दिसून येईल. एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये या समस्येमुळे तब्बल 5 लाख कारच्या विक्रीत घट होईल आणि 5 अब्ज डॉलरचा फटका सहन करावा लागणार आहे.
कंपन्यांना आशा आहे की, या शॉर्टवेजवर येत्या सहा महिन्यांत तोडगा निघेल. कंपन्यांमधून सेमीकंडक्टर आणि चीपचे उत्पादन पूर्वपदावर येईल. जुलै 2022 पर्यंत ही समस्या संपेल.
आज अशीा एकही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही की ज्यात सेमीकंडक्टर आणि चीपचा वापर होत नसेल. सेमीकंडक्टरमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तुंमध्ये क्रांती आली आहे आणि आपलं जीवन सुखकर होत आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूत याचा वापर होतो. पण सध्या तुटवड्यामुळे ऑटोमोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. एकीकडे सेमीकंडक्टरचा तुटवडा असतानाच, डिलिव्हरी तर उशीरा मिळणारच आहे, पण ग्राहकांनाही तुटवड्यामुळे महागाईचा फटका बसणार आहे.