मुंबई: सध्या शेअर बाजारात हिंदुजा प्रोसिड इंडिया (Proseed India) या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Proseed India कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 11000 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 20 ऑगस्ट 2020 रोजी प्रोसिड इंडिया समभागाचा भाव अवघा 32 पैसे इतका होता. मात्र, एका वर्षात या समभागाची किंमत 35.90 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
याचा अर्थ प्रोसिड इंडियाच्या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना तब्बल 11000 टक्के रिटर्न्स दिले आहेत. वर्षभरापूर्वी एखाद्या व्यक्तीने प्रोसिड इंडियाचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 1.12 कोटी रुपये इतके झाले आहे.
गेल्या महिनाभरात प्रोसिड इंडियाच्या समभागाची किंमत झपाट्याने वाढली आहे. या कंपनीचे भांडवली मूल्य 370.11 कोटी रुपये इतके आहे.
या कंपनीचा समभाग झपाट्याने वर जात असला तरी प्रोसिड इंडियाच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक शंका आहेत. या समभागाची किंमत झपाट्याने वाढत असली तरी कंपनी सातत्याने तोट्यात आहे. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत प्रोसिड इंडियाला 9 लाख रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, यंदा याच कालावधीत तोट्याची रक्कम 30 लाखांवर जाऊन पोहोचली आहे.
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स