मुंबई: शेअर बाजारात सध्या Rajratan Global Wire Limited या कंपनीचा चांगलाच बोलबाला आहे. कारण या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. Rajratan Global Wire Limited शेअर्सनी एका वर्षात गुंतवणुकदारांना 600 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 20 जुलैला या कंपनीच्या समभागाची किंमत 250.55 इतकी होती. मात्र, आज वर्षभरानंतर या समभागाची किंमत 1765 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी Rajratan Global Wire Limited कंपनीच्या समभागांमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याची किंमत 7.04 लाख इतकी आहे. या शेअरची ग्रोथ सेन्सेक्सपेक्षाही जास्त नोंदवली गेली आहे. 2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरची 304 टक्के ग्रोथ झाली आहे.
जून तिमाहीत या कंपनीने 21.92 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. गेल्यावर्षी याच काळात कंपनीचा निव्वळ नफा अवघा 1.65 कोटी रुपये होता. यावरुन या कंपनीची घोडदौड किती वेगाने सुरु आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स
(Share Market High gain stock Rajratan Global Wire Limited)