दोन वर्ष देशावर कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) व्यवसाय बंद ठेवावे लागले. कंपन्या बंद असल्याने कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली. याचा फटका हा केवळ उद्योग क्षेत्रालाच नाही तर शेअर मार्केटला (Stock market) देखील बसला. कोरोना काळात शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढल्याने अनेक शेअर कोसळत होते, गुंतवणूकदारांची कोट्यवधीची गुंतवणूक बूडत होती. मात्र दुसरीकडे असे देखील काही शहर होते, त्यांनी आपल्या परताव्यामध्ये सातत्य राखत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा केला. या शअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. आज आपण अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. जो शेअर गेल्या दहा वर्षांपासून साततत्याने चांगला परतावा देत आला आहे. सध्या हा शेअर्स गुंतवणूक सल्लागारांच्या पहिल्या पसंतीचा शेअर बनला आहे. हा शेअर आहे केमिकल कंपनी एसआरएफ लिमिडेटचा. या शेअर्सने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे.
दहा वर्षांपूर्वी म्हणजे मे 2012 मध्ये या कंपनीच्या शअर्सची किंमत अवघी 45 रुपये इतकी होती. आज दहा वर्षांनंतर या शेअर्सचे मुल्य 2,239.25 रुपयांवर पोहोचले आहे. याचाच अर्थ गेल्या दहा वर्षांमध्ये या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना पाच हजार टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. जर 2012 मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये दोन हजारांची गुंतवणूक केली असेल तर आता त्याच्या शेअर्सची एकूण किंमत ही एक लाख रुपयांवर पोहोचली आहे.
या कंपनीच्या शेअर्सच्या मुल्यात गेल्या दहा वर्षांत मोठी वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 66,376 कोटी रुपये आहे. मार्च 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने पाचशे कोटींपेक्षा अधिक नफा कमवला आहे. तर त्यापूर्वीच्या तिमाहीमध्ये डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीला 403.25 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याचाच अर्थ कंपनीचा नफा दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे शेअरमधील गुंतवणूक देखील वाढली आहे. पुढील काळात या शेअर्समध्ये आणखी तेजी येऊ शकते असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तवला आहे.