नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात एखाद्यावेळेस असा प्रसंग येतो की, जेव्हा आपल्याला अचानक कर्जाची गरज लागते. कर्ज घेण्याचे अनेक प्रकार असतात, त्यातील प्रमुख प्रकार म्हणजे आपण आपल्याकडे असलेले सोने तारण ठेऊन कर्ज घेतो किंवा आपली जर बँकेत एखादी एफडी असेल तर तिच्यावर कर्ज घेतो. आपल्याला या पद्धतीने सहज लोन मिळते. मात्र असे लोन घेणे योग्य आहे का? त्याचे फायदे तोटे काय आहेत. तसेच तुम्ही जर पूर्वी गोल्ड लोन घेतले असेल आणि ते भरण्यासाठी तुम्ही जर तुमच्या एफडीवर लोन काढणार असाल तर काय काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.
जेव्हा आपल्याकडे एखाद्या बँकेचे गोल्ड लोन असते आणि आपण ते फेडण्यासाठी एफडीवर लोन घेण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम व्याजदर लक्षात घेणे आवश्यक असते. म्हणजेच काय जर बँक तुमच्याकडून गोल्ड लोनवर दहा टक्के दराने कर्ज वसूल करत आहे. मात्र दुसरीकडे तुम्हाला जर एफडीवर पाच ते सहा टक्के व्याज दराने कर्ज मिळाल्यास तुमचा फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एफडीवर कर्ज काढून गोल्ड लोनचे पैसे भरू शकतात. त्यामध्ये तुमचा चार ते पाच टक्क्यांचा फायदा होऊ शकतो. मात्र काही बँका अनेकदा कमी व्याजदराने देखील गोल्ड लोन देतात. अशावेळेस एफडीवर मिळणाऱ्या लोनवर जर जादा कर्ज आकारले जात असेल, तर लोन घेणे टाळावे. असे लोन घेतल्यास आपले नुकसान होऊ शकते.
आता पाहुयात की सोने किंवा एफडीवर लोन काढणे कितपत योग्य आहे. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात. तज्ज्ञांच्या मते तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल किंवा एफडीच्या रुपामध्ये बँकेत काही विशिष्ट रक्कम ठेवली असेल तर ही गुंतवणूक कधीही तुमच्या फायद्याची ठरते. कारण तुम्हाला हवे तेव्हा या दोन आधारावर कर्ज मिळू शकते. मात्र अगदी गरज असेल तेव्हाच या मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरते. आणखी एक महत्त्वाचे म्हणेज सोन्याचे दर हे सातत्याने कमी जास्त होत असतात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना किंवा गोल्ड लोन घेताना सर्व व्यवहार हे काळजीपूर्वकच करावेत, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून दिला जातो.
हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ?