काय सांगताय राव ! मुदत ठेवीवर मिळत नाहीत एवढे व्याज RD वर बॅक नव्हे ही वित्तीय संस्था देत आहे 8.5 टक्के व्याज

| Updated on: May 26, 2022 | 10:26 AM

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने आवर्ती ठेव योजनेत परतावा देण्यात इतिहास रचला आहे. ही वित्तीय संस्था 12 महिन्यांच्या जमा रक्कमेवर 7.05 टक्के, 24 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेसाठा 7.12 टक्के तर 36 महिन्यांच्या आरडीवर 8.18 टक्के आणि 48 महिन्यांच्या आरडीवर 8.34 टक्के तर 60 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेत 8.50 टक्क्यांचे व्याज देत आहे.

काय सांगताय राव ! मुदत ठेवीवर मिळत नाहीत एवढे व्याज RD वर बॅक नव्हे ही वित्तीय संस्था देत आहे 8.5 टक्के व्याज
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई :  जोरदार परतावा देण्यात परंपरागत साधनांमध्ये मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेनंतर आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनेचा अग्रक्रमांक लागतो. गुंतवणुकीचे ही दोन्ही साधने सुरक्षित मानण्यात येतात. एफडी अथवा आरडीतील गुंतवणूक बुडत नाही. हा पैसा सुरक्षित राहतो. परंतू, प्रश्न पडतो तो व्याजाचा. गुंतवणूक करण्यापूर्वी कोणतीही बँक सर्वाधिक व्याज देते, याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते. परतावा जिथे जास्त, त्या बँकेकडे आपोआप ग्राहकांची पावले वळतात. महागाईच्या या जमान्यात सहाजिकच अधिक व्याजाची गरज प्रत्येक गुंतवणुकदाराला(Investor) आहे. पैशाला स्वस्थ बसू देऊ नका, त्याला आपल्यासाठी कामाला लावा, असा मंत्र आता सर्वच तज्ज्ञ देतात. त्यामुळे जास्त परतावा जिथे मिळतो. तिथे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. अशात जर तुम्हाला आवर्ती ठेव योजनेत मुदत ठेवीइतके अथवा जास्त व्याज देत असेल तर ? तर तुमची चांदीच की राव. त्यात ही 8 टक्के व्याज दराने परतावा मिळाला तर सोन्याहून पिवळं. मित्रांनो, ही काही गंमत नाही, खरंच आहे, बँकांपेक्षाही ज्यादा दराने आर्वती ठेव योजनेत 8 टक्के व्याजदराने परतावा देण्यात येत आहे. दोन वित्तीय संस्था (Finance Companies) ग्राहकांना ही सुविधा देत आहे. या दोन्ही वित्तीय संस्था गुंतवणुकीवर 8.5 टक्के व्याज देत आहे.

एमएए असे मानांकन

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी (STFC) आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनी (STUFC) त्यांच्या आवर्ती ठेव योजनेत तगडे रिटर्नस देतात. आरडीवर या दोन्ही वित्तीय संस्था 8.50 टक्के परतावा देत आहेत. या दोन्ही कंपन्या देशाच्या सर्वात मोठ्या नॉन बँकिग फायनान्शियल कंपन्या (NBFC)आहेत. एसटीएफसी आरडी ला क्रिसिल संस्थेचे FAAA मानांकन प्राप्त आहे. तर इक्रा या मानांकित संस्थेने या कंपनीला एमएए असे मानांकन दिले आहे. ही वित्तीय संस्था 12 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत्चाय आरडीवर 8.50 टक्के व्याज देत आहे. आवर्ती ठेव योजनेत 60 महिन्यांच्या कालावधीसाठी रक्कम ठेवल्यास अशा रक्कमेवर 8.50 टक्के परतावा मिळतो. आरडीवरील हे दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत.

हे सुद्धा वाचा

किती मिळत आहे व्याज?

एसटीएफसीच्या आवर्ती ठेव योजनेत 12 महिन्यांसाठी जमा रक्कमेवर 7.05 टक्के, 24 महिन्यांच्या आरडीवर 7.12 टक्के, 36 महिन्यांच्या आरडीवर 8.18 टक्के, 48 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेत 8.34 टक्के आणि 60 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेवर 8.50 टक्के व्याज देण्यात येत आहे.
श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनी आवर्ती ठेव योजनेत 12 महिने ते 60 महिन्यांसाठी आवर्ती ठेव योजना चालविते. आरडीत 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण करणा-या ग्राहकांना कंपनी 8.50 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. आरडी खाते उघडतानाच ग्राहकाला ऑटो रिफंड अथवा मुदत ठेवीत परवर्तित करण्याची सुविधा मिळते.