नवी दिल्ली: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी नवीन स्मार्ट कुकिंग गॅस सिलेंडर लाँच केले आहे. याला कंपोझिट सिलेंडर असे नाव देण्यात आले आहे. या स्मार्ट सिलिंडरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात तुम्हाला किती गॅस शिल्लक आहे आणि शिल्लक आहे, हे सहजपणे कळेल.
कंपोझिट सिलेंडरमध्ये तीन थर असतात. हा सिलेंडर उच्च घनतेच्या पॉलिथीनच्या (एचडीपीई) सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पॉलिमर फायबर ग्लासने झाकलेले असेल. पॉलिमर फायबरग्लासने झाकलेले आहे आणि HPDE जॅकेटचा समावेश असेल.
हे सिलेंडर वजनाला अत्यंत हलके असतील. सध्याच्या स्टील सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडर्सचे वजन जवळपास निम्मे आहे. हा सिलेंडर पारदर्शक असल्याने तुम्हाला सिलेंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे, हे कळू शकेल. त्यामुळे ऐनवेळी गॅस संपल्यावर तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही.
कंपोझिट सिलेंडरला गंज लागत नाही. त्यामुळे हे सिलेंडर फार खराब होत नाहीत. तसेच या सिलेंडरची बांधणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला कंपोझिट सिलेंडर देशातील 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, बेंगलुरू, भुवनेश्वर, चंडीगढ़, चैन्नई, कोईम्बतूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरीदाबाद, गुरूग्राम, हैदराबाद, जयपुर, जालंधर, जमशेदपुर, लुधियाना, मैसूर, पटना, रायपुर, रांची, संगरूर, सूरत, Tiruchirappalli, Tiruvallur, Tumkur, वाराणसी आणि विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे.
10 किलो एलपीजी कंपोझिट सिलेंडरसाठी ग्राहकांना 3,350 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल. पाच किलोच्या सिलिंडरसाठी 2,150 रुपये मोजावे लागतील.
सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सन 2012 नंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.
दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठादारांकडून दर किती वाढवले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या:
पेट्रोल-डिझेलनंतर CNG दरवाढीचा शॉक, नऊ वर्षातील सर्वात उच्चांकी दर
Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर
स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात