नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे लोक आपला बराचसा वेळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर घालवतात. सायबर गुन्हेगार नेमकी हीच संधी साधत आहेत. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारीची (Cyber Crime) प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. गुन्हेगार काही मिनिटांतच आपले बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी नवनवीन फंडे वापरतात. तुम्हाला फ्रॉड कॉल करण्यात येतो. ऑफर देणारे एसएमएस पाठवला जातो. त्यात संबंधित लिंक दिलेली असते. तुमच्या ई-मेल वर आकर्षक जाहिरातीचा मेल पाठवून तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या संपूर्ण फसवणूक कांडात एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमच्या शिवाय सायबर भामट्यांना हे फसवणूक कांड करता येत नाही. तुम्हीच या फसवणुकीचे साक्षीदार आणि बळी असता. फसवणुकीच्या अनेक पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे वेबसाइट स्मिसिंग (Website Smishing)
यात एसएमएस आणि फिशिंग या दोन्हींचा समावेश आहे. देशभरातील लोकांना मॅसेज पाठविण्यात येतो. त्यात खात्यासंबंधी त्रुटी दूर करण्याचे सांगण्यात येते. अथवा केवायसी अद्ययावत करण्यास सांगितले जाते. मोबाईल अद्ययावत करणे, एखाद्यी ऑफर असे जाळे फेकण्यात येते. संबंधित लिंक, टोल फ्री क्रमांक यांचा समावेश असलेले हे संदेश चाचपणी साठी टाकण्यात येते. त्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल टाकले की, तुम्हाला त्याचा परिणाम लगेच आयुष्यभरासाठी लक्षात राहतो.
हा ही बँक फसवणुकीचा एक मार्ग आहे, आजकाल मोठ्या संख्येने प्रकरणे समोर येत आहेत. वेबसाइट स्पूफिंगमध्ये बनावट वेबसाइट तयार करून, सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या मदतीने खातेदाराची फसवणूक करतात.या बनावट वेबसाइट्स खऱ्या दिसण्यासाठी गुन्हेगार खऱ्या वेबसाइटची नावे, लोगो, ग्राफिक्स आणि कोडदेखील वापरतात. ते ब्राउझर विंडोच्या दिसणारे बनावट यूआरएल (URL) देखील तयार करू शकतात. ते बाजूला पॅडलॉक आयकॉनची नक्कल करतात.
सहज हाताळता येणाऱ्या गॅझेटचा सायबर भामटे शस्त्र म्हणून वापर करतात. यात तुमचाच स्मार्टफोन, लॅपटॉप हा तुमच्या हलगर्जीपणामुळे घरभेदी ठरतो. त्यामुळे अज्ञात स्त्रोत कडून आलेला संदेश, लिंक, टोल फ्री क्रमांक समजून घेऊन त्यावर काहीच प्रतिक्रिया न नोंदवणे शहाणपणाचे ठरते.
ईमेल किंवा मजकूर संदेश किंवा ईमेलवरून मिळालेली कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती कधीही सामायिक करू नका
बँकेला त्यांचे नावे किंवा लोगो वापरणाऱ्या संशयास्पद ईमेलबद्दल माहिती द्या
फसवणूक किंवा खात्याशी केलेली छेडछाड ओळखण्यासाठी आपले खाते नियमितपणे तपासा
आपली वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बँक कधीही एसएमएस पाठवत नाही याची खात्री बाळगा.
जर तुम्हाला तुमच्या इंटरनेट बँकिंग सिक्युरिटीचे तपशील जसे की पिन, पासवर्ड किंवा ईमेलमध्ये खाते क्रमांक मागितला जात असेल, तर त्याला प्रतिसाद देऊ नका
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 22 January 2022 #FastNews #BREAKING pic.twitter.com/Dbl7E1XZ4C
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2022
संबंधित बातम्या:
HDFC Life Insurance : एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला “अच्छे दिन”, 3.3 टक्के नफ्यासह उत्पन्नही वाढले
पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी, दर महिन्याला 92.6 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्सचा टप्पा पार