मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे.
असाच एक व्यवसाय म्हणजे अळंबी किंवा मशरुमची शेती. मशरूम केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नव्हे तर निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये मागणी असते.
जर तुम्हाला या व्यवसायातून कमाई करायची असेल तर तुम्हाला मशरूम लागवडीच्या तंत्राकडे लक्ष द्यावे लागेल. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे सहज उत्पादन घेता येते. किमान 40 × 30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात. तुम्ही सरकारी अनुदानाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करू शकता.
बटन, ऑयस्टर, भाताच्या पेंढय़ावर वाढणारी आणि दुधी, अळंबी अशा अळंबीचे व्यापारी तत्त्वावर उत्पन्न घेतले जाते. अळंबीसाठी वापरण्यात येणारा पेंढा शेतातील भातकापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो व अळंबीचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला चोथा हा खत म्हणून पुन्हा शेतात वापरता येतो. यामुळेच अळंबी लागवड हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.
सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल तर एकदा ते योग्यरित्या प्रशिक्षित करणे चांगले.
जर तुम्ही प्रगत तंत्रज्ञानाने त्याची सुरुवात केलीत तर तुम्हाला सुरुवातीपासूनच लाखोंची कमाई करा येईल. जर तुम्ही ते 100 चौरस फूट क्षेत्रामध्ये अळंबीची शेती सुरु केली तर वर्षाला तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा मिळेल.
मशरुमचे बटन आणि शिंपला\धिंगरी मशरुम असे दोन प्रकार असतात. धिंगरी मशरुमची लागवड बटन मशरुमपेक्षा कमी खार्चिक आहे. मशरुम हे पचनक्रियेसाठी चांगेल असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात मशरुमपासून लोणची, पापड, सूप, हेल्थ पावडर, कॅप्सूल आणि हेल्थ ड्रिंक इत्याही उत्पादने बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. घाऊक बाजारात मशरुमला प्रतिकिलो 50 ते 100 रुपये इतका भाव आहे. भारतातील अनेक शहरांमधून मशरुम परदेशातही निर्यात केले जाते.
मशरुमचे हजारो प्रकार असले तरी खाण्यासाठी काही मोजकेच योग्य आहेत. वेगवेगळ्या राज्यांत तेथील हवामानानुसार मशरूमचे काही प्रकार उत्पादनासाठी उत्तम मानले जातात. बिहाराबद्दल चर्चा करायची झाल्यास तेथे ऑयस्टर मशरूम, बटण मशरूम आणि मिल्की मशरूमची लागवड चांगली होते. ऑयस्टर मशरूमची लागवड मार्च व एप्रिलनंतर होत नाही.
उन्हाळ्याच्या काळात मिल्की मशरूमची लागवड सहज करता येते. जर आपण व्यावसायिकदृष्ट्या मशरूमची लागवड केली तर आपण या शेतीतून चांगली कमाईदेखील करू शकतो. मिल्की मशरूमला कॅलोसाइबी इंडिकादेखील म्हटले जाते. या मशरूमसाठी 28 ते 38 अंश डिग्री सेल्सिअस तापमान तसेच 80 ते 90 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असावी लागते. अधिक तापमानातदेखील या मशरूमचे चांगले उत्पादन होते.
संबंधित बातम्या:
पाच रुपयांच्या समभागाची किंमत झाली 42 रुपये, सहा महिन्यांत 700 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदार मालामाल
राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स
तमालपत्राची शेती सुरु करा, काही वर्षांमध्ये व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही