नवी दिल्ली: अलीकडच्या काळात आरोग्यविषयक उत्पादने आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांना सुगीचे दिवस आले आहेत. पारंपरिक पठडीबाहेरच्या अशा व्यवसायांमधून तुम्हाला चांगेल उत्पन्न मिळू शकते. असाच एक व्यवसाय म्हणजे सोया मिल्क मेकिंग युनिट. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय लघुद्योग महामंडळाकाडून (NSIC) प्रशिक्षणही दिले जाते.
पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेतंर्गत या व्यवसायासाठी 90 टक्के कर्ज दिले जाते. त्यामुळे सोया मिल्कच्या प्लांटसाठी एकूण 11 लाख रुपयांचा खर्च येत असला तरी तुम्ही बहुतांश रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभारू शकता. त्यामुळे तुमच्याकडे फक्त दीड लाख रुपये असले तरी तुम्ही या व्यवसायात उडी घेऊ शकता. या प्रकल्पासाठी मुद्रा बँकेतून 80 ते 90 टक्के कर्ज दिले जाते.
राष्ट्रीय लघुद्योग महामंडळाकाडून (NSIC) देशात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर तुम्हाला व्यवसायसंबंधी प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी तुम्हाला सोया मिल्क मेकिंगची प्रक्रिया शिकवण्यात येईल. तसेच व्यवसायाचे व्यवस्थापन आणि मार्केटिंगसंबधीचे शिक्षणही दिले जाईल.
सोया मिल्क प्लांटच्या युनिटसाठी 100 वर्ग मीटर इतकी जागा लागते. तुम्ही भाड्याने जागा घेऊनही हा व्यवसाय सुरु करु शकता. या व्यवसायासाठी यंत्रसामुग्री, ग्राइंडर, कुकर, वायलर, मेकॅनिकल फिल्टर प्रेस, टोपो बॉक्स आणि सोकिंग टँकची गरज लागते.
सोयाबीनच्या बिया गरम पाण्यात पाच ते सहा तास भिजवून ठेवाव्यात. त्यानंतर 8 ते 12 तास या बिया थंड पाण्यात ठेवाव्यात. नंतर या बिया ग्राईंडर आणि कुकिंग मशिनमध्ये 120 अंशांच्या तापमानावर ठेवाव्यात. या प्रक्रियेनंतर तुम्हाला सोया मिल्क मिळेल. सोया मिल्कचा बाजारभाव प्रतिलीटर 30 रुपये इतका आहे. त्यामुळे या व्यवसायातून तुम्हाला महिन्याला साधारण 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.
संबंधित बातम्या:
शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई
सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?
औषधी गुणांनी संपन्न, अनेक आजारांवर गुणकारी, शेवग्याच्या शेतीतून आर्थिक कमाईची संधी, वाचा सविस्तर