यंदाच्या दिवाळीत ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मुलीचे भविष्य करा सुरक्षित, उत्तम परताव्याची खात्री

| Updated on: Oct 30, 2021 | 2:49 PM

सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. व्याजाची गणना आणि चक्रवाढ वार्षिक आधारावर केली जाते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ठेव 50 रुपयांच्या पटीत गुंतवावी लागते. एकरकमी एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही.

यंदाच्या दिवाळीत या योजनेत पैसे गुंतवून मुलीचे भविष्य करा सुरक्षित, उत्तम परताव्याची खात्री
गुंतवणूक
Follow us on

नवी दिल्ली: यंदाच्या दिवाळीत तुम्हाला तुमच्या मुलीला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही एखादी गुंतवणूक करुन तिच्या भविष्यासाठी पैशांची तरतूद करु शकता. अशा गुंतवणूकीमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल. तसेच, तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. व्याजाची गणना आणि चक्रवाढ वार्षिक आधारावर केली जाते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ठेव 50 रुपयांच्या पटीत गुंतवावी लागते. एकरकमी एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही.

कोणाला योजनेत पैसे गुंतवता येतात?

या योजनेअंतर्गत, तिचे पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकतात. मुलाच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळी किंवा तिहेरी मुले जन्माला आल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात.

योजनेची वैशिष्ट्ये काय?

* खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी खाते बंद केले जाऊ शकते.
* मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिचे लग्न झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते.
* या योजनेत जमा केलेल्या रकमेला आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे.
* खाते उघडल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षांच्या कालावधीसाठी योजनेत ठेवी ठेवल्या जाऊ शकतात.
* जर आर्थिक वर्षात खात्यात किमान 250 रुपये जमा केले गेले नाहीत, तर ते खाते डिफॉल्ट खाते म्हणून मानले जाईल.
* डिफॉल्ट खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा चालू केले जाऊ शकते. यासाठी, प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी किमान 250 रुपये अधिक 50 रुपये डिफॉल्ट भरावे लागतील.

रोज 100 रुपयांच्या बचतीद्वारे 15 लाख रुपये

एखादी व्यक्तीने या योजनेत प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास, एका वर्षाला ती 36 हजार रुपये होईल. 14 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यावरील 7.6 टक्के व्याजदरानुसार 9 लाख 87 हजार 637 रुपये होतात. या योजनेच्या नियमानुसार मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर सुकन्या समृद्धी अकाऊंटची मॅच्युरिटी पूर्ण होते. अशावेळी मुलीचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 15 लाख 27 हजार 637 रुपये मिळतात.

संबंधित बातम्या:

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेकडून मेसेज आल्यास काय कराल?

Petrol Price Today: इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 121 रुपये, तर डिझेलने 112 रुपयांचा टप्पा ओलांडला

124 वर्ष जुन्या गोदरेज समूहाच्या संपत्तीची होणार वाटणी; कोणाच्या वाट्याला काय येणार, जाणून घ्या सर्वकाही