तुम्ही झोपेतून उठलाच असाल तर तुमच्या खिश्यावर महागाईचा (Inflation) आणखी एक बोजा पडला पण न राजेहो. दिवसागणिक तुम्ही झोपेतून उठला की, या वस्तूचे दर वाढल्याचे स्वप्न नाही तर वास्तवातील चटके सहन करावे लागत आहे. गॅस महागातो, साखर- पत्ती, गहू, तांदुळ, डाळ ही यादी काही केल्या कमी होत नाही, उलट त्यात भरीस एका वस्तुची भर पडत आहे. आता महागाईच्या या आगीत टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom company) ही उडी घेतली आहे. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलने (Bharti Airtel) त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये (Tariff Plan) दरवृ्द्धीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ग्राहकांकडून अधिक नफ्याची अपेक्षा केली असून त्यासाठी एआरपीयुमध्ये (ARPU) वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. तर आता हे एआरपीयु का भानगड आहे, ते समजून घेऊयात..
ARPU चे दीर्घ स्वरुप आहे, एव्हरेज रेवेन्यू पर युजर, अर्थात प्रत्येक ग्राहकाकडून सरासरी होणारी कमाई. या सुक्ष्म नियोजनातून टेलिकॉम कंपन्या प्रत्येक ग्राहकामागे अधिक नफ्याचे गणित मांडणार आहेत. भारती एअरटेल या नफ्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. कंपनी एआरपीयु 200 रुपये करु इच्छित आहे. सध्या एअरटेलला प्रती ग्राहकामागे 178 रुपये सरासरी कमाईचा लाभ मिळतो. पण नफा वाढवायचा तर त्यासाठी प्रत्येक ग्राहकाच्या खिशावर कंपनीला बोजा चढवावा लागणार आहे. 200 रुपयांच्या गणिताच्या हिशेबानुसार, प्रत्येक ग्राहकावर कंपनी 22 रुपये अतिरिक्त बोजा टाकणार आहे. म्हणजे तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला तात्काळ प्रभावाने काही दिवसात 22 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. बरं भावांनो वाढीचं हे गाडं काही एवढ्या थांबेल, अशा भ्रमात राहू नका, एअरटेल येत्या पाच वर्षात एआरपीयुमध्ये म्हणजे प्रती माणसी 300 रुपयांच्या नफ्याचे गणित मांडू पाहत आहे, तर तुम्ही विचार करा,प्रत्येक महिन्याला तुमचे एक सिमकार्ड सुविधेच्या नावाखाली तुमच्या खिश्यातून किती रक्कम काढणार ते. एअरटेलला भीती आहे की, 5 जी च्या उच्च बोलीची किंमत सरकार टेलिकॉम कंपन्यांकडून वसूल करणार असल्याची. त्यामुळे ही वाढीव रक्कम कंपनी ग्राहकांच्या खिश्यातून काढण्याच्या तयारीत आहे.
एअरटेलचे भारत आणि दक्षिण एशिया खंडाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकरी गोपाल विठ्ठल यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, सरकारने पाईव्ह जीच्या किंमतीत 35 टक्क्यांची कपात केली असली तरी सध्याच्या वाईट स्थितीत ही कपात टेलिकॉम कंपन्यांसाठी फारशी पथ्यावर पडणारी नाही. 2021-22 मध्ये चौथ्या तिमाहीत एअरटेलचा निव्वळ नफा 2008 कोटी रुपयांवर पोहचला होता. तर तिस-या तिमाहीत हा नफा 759 कोटी रुपये इतका होता. एआरपीयु मध्ये कधी वाढ करणार हा निर्णय कंपनी इतर टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयाआधारे घेणार आहे. वोडाफोन-आयडीया त्यासाठी तयारी करत आहे. तर रिलायन्स जीओने याविषयीचे त्यांचे पत्ते अजून उघड केलेले नाहीत.