Bonus Share | गुंतवणूकदार मालामाल, या 5 कंपन्याकडून ‘बोनस’ शेअरचे गिफ्ट!

| Updated on: Aug 29, 2022 | 8:08 AM

Bonus Share | शेअर बाजारातील या नवीन कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहेत. बाजारात या कंपन्या बोनस शेअर देणार आहेत. आता या कंपन्या किती बोनस शेअर देणार आहेत याची माहिती घेऊयात.

Bonus Share | गुंतवणूकदार मालामाल, या 5 कंपन्याकडून बोनस शेअरचे गिफ्ट!
गुंतवणूकदार मालामाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Bonus Share | शेअर बाजार (Share Market) जेवढा जोखमीचा (Risky)आहे, तेवढ्याच यामध्ये कमाईची संधीपण आहे. अभ्यास आणि सातत्याने अनेक जण शेअर बाजारातून बक्कळ कमाई करतात. बाजारात रोजच्या घसरणीसह वाढीतूनच फायदा मिळतो, असे नाही. तर इतर अनेक मार्ग आहेत, ज्यातून गुंतवणूकदार कमाईच्या संधी शोधतो आणि त्यात त्याला यश ही येते. कंपन्या ग्राहकांना बोनस शेअरचे (Bonus Share) गिफ्ट देतात. कंपन्या गुंतवणूकदारांकडे (Investors) असलेल्या शेअरपेक्षा अतिरिक्त शेअरचे वाटप करतात. गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास टाकल्यानंतर कंपनीची प्रगती झाल्याबद्दल ही भेट असते. शेअर बाजारातील काही नवीन, जून्या कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहेत. बाजारात या कंपन्या बोनस शेअर देणार आहेत. आता या कंपन्या किती बोनस शेअर देणार आहेत याची माहिती घेऊयात.

पुढील महिना कमाईचा

पुढील महिन्यात 5 कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे गिफ्ट देणार आहेत. एवढेच नाही तर काही कंपन्यांनी लाभांशही जाहीर केला आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये ज्यांनी जेवढी जास्त गुंतवणूक केली असेल तेवढा जास्तीचा फायदा त्यांना होणार आहे. कंपन्या किती शेअर देतील हे ही कंपन्यांनी घोषीत केले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे.

Pondy Oxides

ही एक रासायनिक कंपनी आहे जी तिच्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात शेअरचा बोनस देणार आहे. या कंपनीने 28 सप्टेंबर ही बोनसची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने एका वर्षात शेअर होल्डर्संना 80 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअर्सची सध्याची किंमत 780 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

Ram Ratna Wires

कंपनीने बोनस जाहीर केला आहे. कंपनी 28 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांना बोनस देईल. एका शेअरच्या बदल्यात एक बोनस शेअर देण्यात येणार आहे. या शेअरचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे वर्षभरात त्याने 39 टक्के परतावा दिला आहे. सध्या या शेअरची किंमत 316 रुपये आहे.

Ruby Mills

या कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. 22 सप्टेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. हा स्मॉल कॅप स्टॉक आहे. एका शेअर वर एक शेअर असे प्रमाण आहे. कंपनीच्या स्टॉकने वर्षभरात 100% पेक्षा जास्तीचा परतावा दिला आहे. सध्या या शेअरची किंमत 566 रुपये आहे.

Jyoti Resins

कंपनी 8 सप्टेंबर 2022 रोजी बोनस देणार आहे. कंपनी 1 शेअरच्या मोबदल्यात 2 बोनस शेअर्स देत आहे. कंपनीच्या शेअरने एका वर्षात 360 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरची सध्याची किंमत 3,566 रुपये आहे.

GAIL

ही सरकारी कंपनी 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर देणार आहे. कंपनीने 6 सप्टेंबर रोजी बोनस शेअर देण्याचे निश्चित केले आहे. एका वर्षात हा स्टॉक 6.14 टक्क्यांनी घसरला आहे. शेअरची सध्याची किंमत 134 रुपये आहे.