बाजारात गुंतवणुकीचा (Investment) पर्याय शोधणाऱ्या सामान्य गुंतवणुकदारांना अनेकदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, फंडांचेही अनेक प्रकार आहेत. त्यातील गुंतवणूक जोखमीची असली तरी सर्वाधिक परतावा देणारी असते. ज्यादा परतावा कोणाला नको आहे. गुंतवणुकदार प्रत्येकवेळी अशा योजनेच्या शोधात असतात. म्युच्युअल फंडांमध्ये ही खासियत दिसून येते ती इक्विटी फंडात (Equity Fund) . इश्क है तो रिस्क है, त्यामुळे ज्यादा परतावा, अधिकचा परतावा (Return) हवा असेल तर तुम्हाला रिस्क कॅल्क्युलेट करावी लागतेच. त्याशिवाय गुंतवणुकीला मज्जा नाही. सध्या इक्विटी फंडात असे दोन फंड आहेत, ज्यात रिस्क तर आहे पण त्यांनी परताव्यात रेकॉर्डब्रेक परतावा दिला आहे. या फंडांची निवड मनी कंट्रोलद्वारे केली जाते. या फंडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे क्रिसिल रेटिंग 4 स्टार्सच्या वर आहे. हे एका वर्षाच्या परताव्याच्या आधारे दर्शविले गेले आहेत. लक्षात ठेवा हे या दोन फंडाच्या कामगिरीचा लेखाजोखा आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुम्ही तुमचा अभ्यास आणि विश्लेषक, तज्ज्ञांचे मत घेऊनच गुंतवणुकीचा पर्याय निवडा.
इक्विटी फंड ही म्युच्युअल फंडांची अशी योजना आहे, ज्यामध्ये बहुतांश फंड कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. त्यांना ग्रोथ फंड असेही म्हणतात. हे फंड त्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे जोखीम घेण्यात, धोका पत्करण्यात मागेपुढे पाहत नाही. त्याचा फायदा त्यांना होतो. दीर्घ मुदतीत त्यांना अधिक परताव्याची अपेक्षा असते.
शेअर्सची निवड वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. लार्ज कॅप, स्मॉल कॅप किंवा मिड कॅप किंवा मल्टी कॅपच्या आधारे स्टॉक्सची निवड करू शकतात आणि विविध क्षेत्रांच्या किंवा थीमच्या आधारे समभागांची निवडही करता येते. जर तुम्हालाही जोखीम पत्करायची असेल आणि दीर्घ मुदतीमध्ये अधिक परतावा मिळवायचा असेल, तर गेल्या वर्षभरात कोणत्या उच्च दर्जाच्या फंडांनी गुंतवणुकदारांना जास्त परतावा दिला आहे ते पाहा.
या योजनेचा एक वर्षाचा परतावा 23 टक्के मिळाला आहे. हा एक लार्ज कॅप फंड आहे आयडीबीआय म्युच्युअल फंड हा या फंडाचे व्यवस्थापन करणार आहे. फंडाचा आकार 554 कोटी रुपये असून खर्चाचे प्रमाण 1.32 टक्के आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेने वार्षिक 51 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत जर एखाद्या व्यक्तीने 1000 रुपयांची एसआयपी केली असेल तर दोन वर्षात 24 हजार रुपयांची गुंतवणूक 32,359 रुपये होईल. या योजनेत 64 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये 69 टक्के गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये, तर 10 टक्के गुंतवणूक स्मॉलकॅपमध्ये आहे. या योजनेत ज्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि टीसीएस यांचा समावेश आहे.
या फंडाचा एक वर्षाचा परतावा 19 टक्के राहिला आहे. या योजनेचे फंड हाऊस एलआयसी एमएफ आहे. ही योजना श्रेणी लार्ज कॅप फंड आहे. फंडाचा आकार 637.58 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण 1.29 टक्के आहे.या योजनेने दोन वर्षांत वार्षिक 41 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत कुणी एक हजार रुपयांचा एसआयपी केला असेल तर दोन वर्षांत 24 हजार रुपयांची गुंतवणूक 30 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. योजनेचा 80 टक्के भाग लार्ज कॅपमध्ये आणि सुमारे 8 टक्के मिडकॅपमध्ये ठेवण्यात आला आहे. इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे पोर्टफोलिओमधील सर्वात मोठे स्टॉक्स आहेत.
Petrol, diesel prices : आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा