नवी दिल्ली : रेल्वेने (Train) प्रवास करताना तुम्हाला अनेकदा तिकीट तपासणीसाने (TTE) तिकीटासाठी हटकले असेल. त्याने तुमच्याकडील तिकीट तपासले असेल. पण एक नियम तुम्हाला कदाचित माहिती नसेल. हा नियम रात्री प्रवासादरम्यान तिकीट तपासण्यासंबंधीचा आहे. रात्री 10 वाजेनंतर टीटीई तिकीटासाठी तुम्हाला विचारणा करत असेल तर तुम्हाला त्याला नकार देता येतो. रेल्वेच्या नियमानुसार, रात्री 10 वाजेनंतर प्रवासी आराम करत असेल तर त्याला उठवून तिकीट तपासण्याचा टीटीईला अधिकार नाही. भारतीय रेल्वेने प्रवासासाठी आणि प्रवाशांसाठी काही नियम (Train Ticket Rules) तयार केलेले आहेत.
जर तुम्ही रात्री रेल्वेने प्रवास करत असाल तर रात्री 10 वाजेनंतर सकाळपर्यंत टीटीई तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. तो तुमच्याकडे तिकीटाची मागणी करु शकत नाही. जर एखादा टीटीई रात्री 10 वाजता तुमचे ट्रेनचे तिकीट तपासण्यासाठी येत असेल तर तुम्हाला नियमानुसार त्याला मनाई करता येते.
ट्रेनच्या प्रवासात हा नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेच्या डब्यात नाईट लाईट ऐवजी मोठे लाईट्स बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रात्री झोपताना कुठलाही अडथळा येत नाही. त्यांच्या झोपेचे खोबरे होत नाही. त्यांची पुरेशी झोप होते.
आणखी एक नियम जो कदाचित माहितीच नाही. तो म्हणजे रात्रीच्यावेळी तुम्ही गप्पांचा फड रंगवून इतर प्रवाशांची झोप मोडू करु शकत नाही. रेल्वेने याविषयीचा खास नियम तयार केला आहे. त्यानुसार, रात्री 10 वाजेनंतर प्रवाशांना मोठ्या आवाजात गप्पा झोडता येत नाही. तुमच्या गोंगाटाचा इतर प्रवाशांना त्रास होता कामा नये.
भारतील रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 141 नुसार, नाहक आणि विनाकारण चेन ओढल्यास तो अपराध ठरतो. या नियमानुसार, एक वर्षाचा कारावास आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावते. तुमचा सहप्रवासी, मुलं, वृद्ध अथवा अपंग व्यक्ती स्टेशनवरच राहिला तर कारवाई टाळता येते.
तसेच अपघात झाल्यास, अपघाताबाबत आगाऊ माहिती मिळाल्यास, इतर आपत्कालीन परिस्थितीत चेन ओढल्यास कारवाई होत नाही. धावत्या रेल्वेत चेन ओढण्यासाठीचे सबळ कारण तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण रेल्वेची चेन ओढता येत नाही.